Maharashtra Election : निवडणुकीच्या तोंडावर भाजपममध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला सर्वाधिक पसंती? सर्व्हेतून आकडेवारी समोर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळने सर्व्हेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणामध्ये महाविकास आघाडीला पुन्हा एकदा पसंती देण्यात आली आहे. मात्र, भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहण्याची चिन्हे आहेत.
Maharashtra Election : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महायुतीला महाविकास आघाडीकडून दणका बसला. महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकत महायुतीला धोबीपछाड दिला. सांगलीचे बंडखोर खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा काँग्रेसला पाठिंबा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडीतील खासदारांची संख्या 31 वर पोहोचली. मात्र, आता त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीने आपली एकजूट दाखवताना नऊपैकी नऊ जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीचे उमेदवार शेकाप आमदार जयंत पाटील पराभूत झाल्याने मोठा दणका बसला आहे.
जयंत पाटील यांना शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांना पहिल्या पसंतीची 12 मते मिळाली. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे काँग्रेसची सुद्धा आठ मते फुटल्याने मोठा झटका बसला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीमध्ये एक प्रकारे महायुतीने मोठा दणका महाविकास आघाडीला दिला आहे.
सर्वेक्षणामध्ये महाविकास आघाडीला पुन्हा एकदा पसंती
दरम्यान, दैनिक सकाळकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमधून आकडेवारी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळने सर्व्हेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणामध्ये महाविकास आघाडीला पुन्हा एकदा पसंती देण्यात आली आहे. मात्र, भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे राज्यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये दोन मोठे प्रादेशिक पक्ष फुटल्याने मोठ्या राजकीय उलथापालथी घडल्या. शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी खिंडार पाडले. राष्ट्रवादी फोडून अजित पवार यांन दुसरा गट निर्माण केला. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत चित्र कसं असेल? याबाबत सर्वेक्षण करण्यात आलं आहे.
भाजपमधून कोणता चेहऱ्याला अधिक पसंती?
दरम्यान, राज्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहील अशी शक्यता सर्वेक्षणामधून वर्तवण्यात आली आहे, तर भाजपमधून कोणता चेहरा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला आवडेल या संदर्भात सुद्धा सर्वेक्षण करण्यात आलं आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 18.80% टक्के मते मिळाली आहेत. भाजपमधून इतर कोण या प्रश्नावर अंदाज घेतला असता तब्बल 47.24% लोकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पसंती दिली आहे. त्यामुळे सकाळच्या सर्व्हेत नितीन गडकरी यांची लोकप्रियता राज्यात सर्वाधिक असल्याचे स्पष्ट होते. इतरमध्ये 13.24 टक्के लोकांना पसंती दिली आहे. विनोद तावडे यांना विनोद तावडे यांना 6.29 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. पंकजा मुंडे यांना 5.6% लोकांनी पसंती दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या