Manoj Jarange Meeting: आंतरवाली सराटीत आज मनोज जरांगेंची महत्त्वाची बैठक; सरकारला दिलेल्या अल्टीमेटमसंदर्भात पुढील दिशा ठरणार
मराठा आंदोलक मनोज जरंगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिलेल्या 24 डिंसेबरच्या अल्टीमेटमनंतर आरक्षणासंदर्भात आपली भूमिका आणि पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज बैठक बोलावली आहे.
Manoj Jarange Meeting At Jalana: जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढाईची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज (रविवार, 17 डिसेंबर) महत्वाची बैठक आंतरवाली सराटीमध्ये बोलावली आहे. आजच्या बैठकीत सरकारला दिलेल्या अल्टीमेटमसंदर्भात पुढील दिशा ठरणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरंगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिलेल्या 24 डिंसेबरच्या अल्टीमेटमनंतर आरक्षणासंदर्भात आपली भूमिका आणि पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज बैठक बोलावली आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीतच ही बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारकडून आरक्षणासंदर्भात काय झालं आणि पुढील आंदोलनाची दिशा काय असणार यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता या निर्णायक बैठकीला सुरुवात होईल.
सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपल्यानंतर पुढे काय? जरांगेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
मनोज जरंगे यांनी सरकारला दिलेल्या 24 डिसेंबरच्या अल्टीमेंटमनंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाज बांधवांची राज्यव्यापी बैठक अयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला, राज्यभरातील संव्यसेवक, समनव्यक, सभांचे आयोजक, तसेच वकील, डॉक्टर आणि आरक्षण विषयातील तज्ज्ञ मंडळी असणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटीमध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेच्या ठिकाणीच ही सभा अयोजित करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाबाबत जरांगेंनी 24 डिसेंबरचा आग्रह धरू नये : गिरीश महाजन
मराठा आरक्षणाबाबत जरांगेंनी 24 डिसेंबरचा आग्रह धरू नये असं आवाहन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केलं. काल सरकारी शिष्टमंडळाने मनोज जरांगेंची रूग्णालयात भेट घेतली. आणि सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सरकारकडे क्युरेटिव्ह पिटीशन आणि मागासवर्ग आयोग असे दोन पर्याय आहेत, टिकणारं आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी वेळ लागेल असं महाजन यांनी म्हटलंय. सरकारने लेखी स्वरूपात दिलेल्या सर्व गोष्टी पाळल्या तर वेळ वाढवून देण्याची गरजच लागणार नाही असं जरांगेंनी म्हटलं आहे. तसेच, सध्या जरांगे आणि भुजबळांमध्ये रंगलेल्या वाक्युद्धावरही गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ आणि जरांगे यांनी एकमेकांना शब्दाला शब्द वाढवू नये असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं. तर भुजबळ विनाकारण गावोगावी आंदोलनं घेत वाद वाढवतायत असा आरोप जरांगेंनी केला. त्यावर भुजबळांनीही प्रत्युत्तर दिलंय.
पाहा व्हिडीओ : Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंची भूमिका आणि आंदोलनाची दिशा आजच्या बैठकीत ठरणार
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'हा जो काय त्याचा लाड चाललाय, ते काही कळत नाही', शिष्टमंडळाच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया