'हा जो काय त्याचा लाड चाललाय, ते काही कळत नाही', शिष्टमंडळाच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया
कोणतं शिष्टमंडळ भेटायला गेलंय त्याबद्दल मला काही कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
!['हा जो काय त्याचा लाड चाललाय, ते काही कळत नाही', शिष्टमंडळाच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया Chhagan Bhujbal NCP Ajit Pawar Group leader slams Manoj Jarange Nagpur Maharashtra detail marathi news 'हा जो काय त्याचा लाड चाललाय, ते काही कळत नाही', शिष्टमंडळाच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/bf35e5a5f61a6425e2702d5d1d101ef41702122052775265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : कुणाच्या नादी लागू नका त्याच्या नादी कोण लागणार. आम्ही ओबीसींवर कोणालाही आक्रमण होऊ देणार नाही. त्यासाठी आमचा लढा आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यास आमचा विरोध नाही. कोणतं शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं, याबाबत मला कल्पना नाही. मला थ्रोट इन्फेक्शन असल्याने आज दिवसभर आराम केला, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ शनिवार 16 डिसेंबर रोजी मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलं होतं. ओबीसीतूनच पाहिजे हा जो काय त्याचा लाड चाललाय तो काही कळत नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासनाची तयारी कुठपर्यंत आली आहे, शिंदे समितीच्या आतापर्यंतच्या अभ्यासाची माहिती या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना दिली. तसेच शिष्टमंडळांने मनोज जरांगे यांच्या तब्येतीचीही चौकशी केली आणि त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळात राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे हे होते. त्यांनी जरांगे यांची रुग्णालयात भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली.
तोपर्यंत आमचा लढा सुरु राहिल - भुजबळ
राज्यभरात सध्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी आढळून येत आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप देखील करण्यात येत आहे. यावर बोलताना भुजबळांनी म्हटलं की, जे काही असेल ते बाहेर येईल. जोपर्यंत आमच्यावरचं आक्रमण दूर होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरु राहिल. या राज्यामध्ये 54% ओबीसी आहेत. बाकी सगळे मागासवर्गीय आहेत. सगळ्यांनी लक्षात ठेवावं अशा रीतीने कुठल्याही लहान समाजावर अन्याय होणार असेल तर महाराष्ट्रातील विचारवंत मराठासुद्धा विरोध करेल, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.
'गर्दी कमी झाली त्याबद्दल कल्पना नाही'
मला गर्दी का कमी झाली त्याबद्दल माहिती नाही. कदाचित आयोजकांना वेळ कमी मिळाला असेल आणखी काही कारणे असतील मला कल्पना नाही. आम्ही सगळीकडे सभा घेणार आहोत. आमचं ओबीसी समाजाचं जागरण सुरुच राहिल. सभा लहान असली मोठी असली तरी याची आम्हाला परवा नाही. मराठा समाजाला काय करायचं ते त्यांना करू द्या आम्हाला जे करायचं ते आम्ही करु. सरकारला जे करायचं ते सरकार करेल, असं भुजबळांनी म्हटलं
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)