Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी केली असून ज्यांनी आरक्षणाला त्रास दिला त्याला सोडू नका, त्यांचा उभा कार्यक्रम करा, असा इशारा त्यांनी दिलाय.
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीतून (Maharashtra Assembly Elections 2024) माघार घेण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीत माघार घेतली असली तरी मराठा समाजाने ज्याला पाडायचं आहे, त्याला पाडावं, असं त्यांनी जाहीर केलं आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी केली असून ज्यांनी आरक्षणाला त्रास दिला त्याला सोडू नका, त्यांचा उभा कार्यक्रम करा, असा इशारा त्यांनी दिलाय.
मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, संभ्रम शब्द सारखा वापरला जात आहे, संभ्रम असण्याचे काही कारण नाही. आपण आरक्षणासाठी एकत्र आलोत. मराठा समाजात संभ्रम नाही. स्वत निवडून येण्यासाठी काही जण संभ्रम पसरवत आहेत. लोकसभेला सन्मान मराठा समाजाला होता. आता ज्याला पाडायचे त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचे त्याला आणा, मतदान तुमच्या हातात आहे. तुमच्या हिताचा निर्णय घ्या, ज्याने आपल्या जातीवर अन्याय केला, त्याला पाडा, असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे.
राज्यभरात कोणालाच पाठिंबा दिला नाही
मराठा समाजाने गावागावात आपल्या आंदोलनाशी सहमत असणाऱ्यांचा (उमेदवारांचा) (आंदोलनाला) समर्थन म्हणून व्हिडिओ घ्या. तो व्हिडिओ अगोदरच जाहीर करू नये. प्रत्येक गावात, उभं राहिलेल्या कार्यकर्त्यांनी उमेदवाराकडून तुम्हीच व्हिडिओ करून घ्या. मी कोणाला पाडा, यासाठी पक्षाचे नाव सांगितले नाही. राज्यभरात कोणालाच पाठिंबा दिला नाही, मी त्यातून अलिप्त झालोय, माझा पाठिंबा मविआ, महायुती, अपक्ष कोणालाही पाठिंबा नाही. मला राजकारणापेक्षा आपण सर्व जण मिळून आपल्या आंदोलनाची तयारी करू.
आजपासून पुढील आंदोलनाची तयारी
आपल्याला कोणाशी काही देणेघेणे नाही. ज्यांनी आरक्षणाला त्रास दिला त्याला सोडू नका, त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडायचं नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडणार नाही. आपलं कोणी काही करू शकत नाही, कोणाची सत्ता येऊ द्या , देवेंद्र फडणवीस सुध्दा आपलं काही करू शकत नाही. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. मी आता मराठ्यांच्या हातात कारभार दिलाय. मत वाया जाता कामा नये. पुढच्या वेळी सामूहिक उपोषण करणार आहे. मी माझ्या समाजाचे आशीर्वाद घ्यायला जाणार आहे. आरक्षणाच्या विरोधात जे जे बोललेत ते सुटता कामा नये. आजपासून पुढील आंदोलनाची तयारी सुरू केली आहे, असे त्यांनी म्हटले.
मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला. त्यांनी म्हटलंय की, चाळीस वर्षे जेवढे नुकसान झालं नाही तेवढं तू पाच वर्षात नुकसान केलं. चाळीस वर्षांपूर्वी काय नुकसान झालं? डोळ्याच्या माघारी आम्हाला माहिती नाही. त्यांनी काही केलं नाही म्हणून तर तुम्हाला सत्तेवर बसवलं. दीड वर्ष आंदोलन सुरू आहे, हे कळत नाही. आरक्षण दुसऱ्यांना देतात, आमचा मुडदा पडायची वेळ आली. स्वतःची आई कळते, दुसऱ्याची आई कळत नाही. मराठ्यांचा आणि मराठा महिलांचा त्यांनी अपमान केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, नुकसान भरपाई दिली नाही. मी पुन्हा गुडघ्यावर टेकवील. तुम्ही भाजपमधील लोक कसे संपवले. लाडकी बहीण आणून गोरगरिबांचे वाटोळं केलं. भाजपमधील मराठ्यांना आरक्षण लागत नाही का? एवढा अकास आणि द्वेष मराठा समाजाविषयी का? ज्याला पाडायचे त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचे त्याला आणा. आता फक्त तुम्ही अडचणीत येऊ नये म्हणून गावपातळीवर निर्णय घ्या. मतदानाला जायचं आणि पाडायचं, असे मनोज जरांगे पाटलांनी म्हटले आहे.
आणखी वाचा