एक्स्प्लोर

Jalgoan Accident : धक्कादायक! भरधाव डंपरने बकऱ्यांच्या कळपास चिरडले, जळगाव तालुक्यातील घटना

Jalgoan Accident : भरधाव डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या अनेक बकऱ्यांना चिरडल्याची घटना जळगाव तालुक्यात घडली आहे.

Jalgoan Accident : नाशिकसह (Nashik) विभागात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये (Accident) वाढ होत असून रस्ता ओलांडतांना अनेकदा अपघाताच्या घटना घडत आहेत. अशातच भरधाव डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या तब्बल 15 बकऱ्यांना चिरडल्याची घटना जळगाव तालुक्यात घडली आहे. चिंचोली गावाजवळ रस्ता ओलांडत असताना तब्बल 15 बकऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे.  

जळगाव (Jalgaon) तालुक्यातील चिंचोली गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या तब्बल 15  बकऱ्यांना चिरडल्याची (Truck Accident) धक्कादायक घटना बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी डंपरचालकाला पकडून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. चिंचोली येथील कैलास लटकन कोळी हे बकऱ्या पालनाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असून त्यांच्याकडे 20  ते 25 बकऱ्या आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे बकऱ्यांना चारण्यासाठी गेले होते. त्यानंतर रानातून बकऱ्यांना चारून ते दुपारी 12 वाजेच्या सुमारास चिंचोली गावात आले. 

दरम्यान कैलास कोळी हे बकऱ्यांना महामार्गावरून ओलांडून नेत असतांना जामनेकरकडून जळगावकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने बकऱ्यांना चिरडले. यात एकुण 15  बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत डंपरचालकाला ताब्यात घेतले. या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, डंपरचालकाला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत सदर मार्गावर अनेकदा आपघटच्या घटना घडल्या आहेत. महामार्ग असल्याने वेगाने वाहने जात असतात. अशावेळी रस्ता ओलांडताना किंवा वाहनामध्ये अपघात झाले आहेत. 

नाशिकमध्ये प्रवाशी वाहनाचा अपघात... 

चांदवडकडून (Chandwad) लासलगावच्या दिशेने येत असताना विंचूर प्रकाशामार्गावर गायकर पेट्रोल पंपाजवळ प्रवासी वाहनाच्या झालेल्या अपघातात (Cruser Accident) पाच मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज मंगळवारी सकाळी प्रवासी वाहन क्रूझर या वाहनाने मध्यप्रदेश येथील वीस मजूर कामासाठी नारायणगाव पुणे या ठिकाणी घेवुन जात होते. यावेळी लासलगाव-चांदवड रोडवरील गायकर पेट्रोल पंपाजवळ सायकलने लासलगावकडे जाणाऱ्या शाळकरी मुलास वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचा गाङीवरील ताबा सुटला. सदर क्रुझर गाडीने उलटल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात पाच मजुर जखमी झाले असुन चालकासह काहींना दुखापत झाली आहे. अपघात होताच परिसरातील नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीस धावून आले. जखमींना तीन रुग्णवाहिकांद्वारे लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget