(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sant Namdeo Maharaj : 'नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे', संत नामदेव महाराज यांचा 673 व्या संजीवनी समाधी सोहळा, जळगावात भव्य मिरवणुकीचे आयोजन
Sant Namdeo Maharaj : आजच्या दिवशी पंढरपुरात संत नामदेव महाराज यांनी आपल्या कुटुंबासह समाधी घेतली होती, म्हणूनच हा संजीवनी समाधी महोत्सव साजरा केला जातो.
Sant Namdeo Maharaj : संत नामदेव महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदवला आहे. संत नामदेव यांच्या 673 व्या संजीवनी समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याच दिवशी पंढपुरात संत नामदेव महाराजांनी आपल्या कुटुंबासह समाधी घेतली होती. म्हणूनच संजवीन समाधी सोहळा साजरा केला जातो.
क्षत्रिय आहीर शिंपी समाजातर्फे संत नामदेव महाराज यांच्या 673 व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त शनिवार (15 जुलै) रोजी मिरवणूकीचे आयोजन जळगावमध्ये करण्यात आले होते. संत नामदेव महाराजांनी पंढपुरात समाधी घेतली होती. पंढपुरात आजही पहिल्या पायरील संत नामदेवाची पायरी म्हणून मान आहे. टाळ मृदुगांच्या गजरात संत नामदेव महाराजांचा जयघोष या मिरवणुकीमध्ये करण्यात आला.यावेळी महिलांनी पारंपारिक वेशभूषा करत या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला.
संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. वारकरी संप्रदायाचे प्रचारक म्हणून संत नामदेवांचे नाव महाराष्ट्रातील थोर संतांच्या यादीमध्ये घेतले जाते. त्यांच्या अभंग, ओव्या, किर्तनकलेचा नावलौकीक प्रत्यक्ष पांडुरंगाला देखील डोलायला भाग पाडणारा म्हणून होता. त्यांनी भागवत धर्माचा प्रचार पंजाबपर्यंत करण्याचे महान कार्य केले आहे.
संत नामदेवांनी जवळपास 25,000 अभंग रचले. त्यामधील सुमारे 62 अभंग शीख पंथांच्या गुरुग्रंथसाहेब या ग्रंथामध्येही आढळतात. महाराष्ट्राला लाभलेल्या संतांच्या संस्कृतीमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत नामदेव या संतांची नावे भक्तीभावाने घेतली जातात. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी या संतांच्या गजरात विठुरायाच्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात.
अशी आहे संत नामदेवांबद्दलची आख्यायिका
संत नामदेवांच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निरागसतेमुळे विठ्ठलाचे आणि त्यांचे नाते अगदी जवळचे असल्याचं म्हटलं जातं. एकदा संत नामदेवांच्या वडिलांनी त्यांना देवाला प्रसाद दाखवायला सांगितला. त्या दिवशी संत नामदेवांनी नुसता नेवैद्या दाखवला नाही तर ते देवापुढे वाट बघत बसले की देव केव्हा तो नेवैद्या खाईल. या निरागसतेला प्रत्यक्ष विठ्ठलाने प्रकट होऊ नामदेवांनी दिलेला प्रसाद ग्रहण केला असं म्हटलं जातं.
पंढपुरात जाणाऱ्या मानाच्या पालख्यांपैकी संत नामदेवांच्या पालखीला देखील विशेष महत्त्व आहे. या पालखीला 26 वर्षांचा इतिहास आहे. पालखीच्या या सोहळ्यात वारकरी पायी प्रवास करुन पंढरपूरला जात असतात. 22 दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात.
हे ही वाचा :
Ashadhi Wari: विठुरायाच्या चरणावर भाविकांचे भरभरून दान; तब्बल 6 कोटी 27 लाखाचे मिळाले उत्पन्न