Jalgaon gold Rate : अवघ्या 36 तासांत सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ, जळगावमधील सोन्याचा दर जाणून घ्या एका क्लिकवर
Jalgaon Gold Rate : जळगाव सुवर्णनगरीत गेल्या छत्तीस तासात शुद्ध सोन्यात प्रति तोळा 1000 रुपयांची वाढ झाली आहे.

जळगाव : एकीकडे दसरा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून सोने खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे इस्त्रायल आणि हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र असून गेल्या 36 तासात जळगाव सुवर्णनगरीत शुद्ध सोन्यात प्रति तोळा 1000 रुपयांची वाढ झाली आहे. तर दोन दिवसांपूर्वी पूर्वी 60000 रुपये असलेले सोने आज 61000 हजार रुपये दरावर पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यंदा दसरा सण उत्साहात साजरा होणार असल्याची चिन्हे असून मात्र दुसरीकडे इस्त्रायल आणि हमास युद्धामुळे आंतरराष्ट्रीय गणिते कोलमडली आहेत. त्याचा परिणाम सोने चांदीच्या दरावर देखील झाल्याचे पाहायला मिळतं आहे. एकीकडे दसऱ्याच्या सणामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे, त्याचा परिणाम सोन्याच्या दर वाढीत झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव सुवर्णनगरीत गेल्या छत्तीस तासात शुद्ध सोन्यात प्रति तोळा 1000 रुपयांची वाढ झाली आहे. दोन दिवस पूर्वी 6000 रुपये असलेले सोने आज 61000 हजार रुपये दरावर पोहोचले आहे. उद्या दसरा सण असून जळगावसह संपूर्ण देशभरात अनेक ग्राहक सोने खरेदी करत असल्याने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणत वाढली असून उद्या आणखी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सोने विक्रेत्यांचे मत आहे.
दरवाढीमुळे नागरिकांचा हिरमोड
एकीकडे दसऱ्याला सोने लुटण्याची परंपरा आहे, त्याच पार्श्वभूमीवर अनेकजण नव्या गोष्टी खरेदी करून सुरूवात करतात. मग नवे कपडे, गोडाधोडाचे जेवण आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवी सोनं खरेदी होय. त्यामुळे यंदा सोने खरेदीवर चांगलाच जोर पाहायला मिळत आहे. मात्र ग्राहकांची सोने खरेदीकडे कल वाढत असताना दुसरीकडे दरात वाढ झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात आज एक हजार रुपयांची वाढ झाल्याने थोडे बजेट बिघडले असले तरी उद्या दसऱ्या सणामुळे आणि काही दिवसांवर आलेल्या दिवाळीमुळे सोन्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याने आम्ही आजच सोने खरेदी करत आहोत, सोन्याची खरेदी ही कधीही फायदेशीरच असल्याचं ग्राहक दिपाली पाटील यांनी म्हटल आहे.
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
