एक्स्प्लोर

Jalgaon Crime : एरंडोल येथील वसतिगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, काळजीवाहकासह तिघांवर गुन्हा दाखल

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेल्या मुलींच्या वसतिगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण काळजीवाहकानेच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेल्या मुलींच्या वसतिगृहातील (Girls Hostel)  पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण (Sexual Assault) काळजीवाहकानेच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत बुधवारी (26 जुलै) सरकार पक्षातर्फे स्वतः पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून त्या फिर्यादीवरुन काळजीवाहक तसेच काळजीवाहकाला साथ देणाऱ्या त्याची पत्नी वसतिगृहाच्या अधीक्षका तसेच सचिव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पीडित मुलींना बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.

काही महिन्यांपूर्वी नाशिकला खासगी वसतिगृहात मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. ही चांगलीच चर्चेत आली होती. त्यातच एरंडोल येथील प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून या वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गणेश शिवाजी पंडित असे या मुलींवर अत्याचार करणाऱ्या काळजीवाहकाचे नाव आहे. 

एरंडोल तालुक्यातील खडके गावात शासन मान्यतेचे खाजगी संस्थेचे मुलींचे वसतिगृह आहे. गेल्या जून महिन्यात हे वसतिगृह बंद पडल्यानंतर या वसतिगृहात दाखल पाच मुलींना जळगाव येथील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आल्या. येथील वातावरणात स्थायिक  झाल्यानंतर या मुलींनी बाल सुधारगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे खडके येथील वसतिगृहात दाखल असताना तेथील काळजीवाहकाने लैंगिक अत्याचार केल्याबाबतची माहिती दिली. 

तीन संशयितांना अटक

हे गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर जळगाव बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांनी एरंडोल पोलिसांना पत्र दिले होते. त्यानुसार या गंभीर प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेत पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन एरंडोल पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. 2022 ते वसतिगृह बंद होईपर्यंत म्हणजे वर्षभर मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा काळजीवाहक गणेश पंडित याला अटक करण्यात आली आहे. तसेच माहिती असूनही हे प्रकरण लपवून ठेवून गणेश पंडित याला साथ देणारी त्याची पत्नी तसेच वसतिगृहाची अधीक्षक आणि सचिव यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

शासन मान्यता मात्र वसतिगृह बंद  

गेल्या जून महिन्यात वसतिगृह बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी दाखल असलेल्या पाचही मुलींना जळगाव मुलींचे निरीक्षण गृह याठिकाणी दाखल करण्यात आले. महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने मुलींचे जबाब घेण्यात आले असून त्यानुसार पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार करणाऱ्या काळजीवाहकाला अटक करण्यात आली आहे. शासनाची मान्यता असलेले सदरचे वसतिगृह हे एका खासगी संस्थेचे असून ते जून महिन्यात बंद पडले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली.

हेही वाचा

Solapur News : दोन वर्षांपासून वीज बिल थकीत, सोलापुरातील समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह धूळखात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget