एक्स्प्लोर

Gulabrao Patil : ठाकरेंना का सोडलं? गुलाबराव पाटील म्हणाले, मी जाणार नव्हतो शिंदे साहेबांचा फोन आला अन्...

Gulabrao Patil : शिंदे सरकार स्थापन करण्यासाठी जेव्हा बाहेर पडलो. तेव्हा मी जात नव्हतो मात्र शेवटी शिंदे साहेबांचा फोन आला आणि तेव्हा मी गेलो, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

Gulabrao patil जळगाव : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंद करत 2022 साली शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का दिला. त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार गेल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले.  या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) नेमकं का सोडून गेलो? याबाबत वक्तव्य केले आहे. 

शिंदे सरकार स्थापन करण्यासाठी जेव्हा बाहेर पडलो. तेव्हा मी जात नव्हतो मात्र शेवटी शिंदे साहेबांचा फोन आला आणि तेव्हा मी गेलो. 40 आमदार गेले त्यात जाण्यामध्ये माझा 33 वा नंबर होता, अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना सोडून बाहेर पडल्यानंतरची सांगितली. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील रीधुर गावातील अवचित हनुमान मंदिरावरील विकास कामांच्या सोहळ्यात जोरदार फटकेबाजी केली. 

जळगाव जिल्ह्यात दहा वेळा येणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे 

ते म्हणाले की, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आज अभिमान वाटतो की, तो निर्णय घेतला नसता तर कदाचित आज एवढी कामं झाले नसते. नुसतं गावात आपला सरपंच जरी नसला तरी किती हाल होता. सरपंच्यांच्या बाजूच्या माणसाच्या पोलवर गावात लाईट लागतो. विरोधकाच्या पोलवर लाईट लागत नाही. 16 महिन्यांमध्ये दहा वेळा जळगाव जिल्ह्यामध्ये येणारा हा एकमेव मुख्यमंत्री आहे की ज्याचे नाव एकनाथ शिंदे आहे.  

भगवा झेंडा घेऊनच आम्ही काम करतोय

आम्ही गद्दारी केली नाही. शिवसेनाप्रमुखांनी जो भगवा झेंडा आमच्या हातामध्ये दिला होता तो भगवा झेंडा घेऊनच आज आम्ही काम करतोय, उद्याही करणार आहोत आणि मरेपर्यंत करणार आहोत. माझ्या मतदारसंघात असे एकही गाव कुणी सांगू शकत नाही, त्या गावात मंत्री गुलाबराव पाटील यांचा निधी पोहोचला नाही. 

मी स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही

मी आठ वर्षापासून मंत्री आहे. पण कोणीही असं म्हणू शकत नाही की गुलाबराव पाटलांनी त्यांच्या अंगात मंत्रीपद आणलं. मी तुमच्याशी खोटं बोलू शकतो पण मी स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

Raj Thackeray : मराठ्यांनो यांच्या भुलपाथांना बळी पडू नका ते अरबी समुद्रात शिवस्मारक! राज ठाकरेंनी वाभाडे काढले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
Embed widget