एक्स्प्लोर

Raj Thackeray : मराठ्यांनो यांच्या भुलपाथांना बळी पडू नका ते अरबी समुद्रात शिवस्मारक! राज ठाकरेंनी वाभाडे काढले

MNS Vardhapan Din : मनसेचा 18 वा वर्धापन दिन सोहळा आज नाशिकमध्ये पार पडला. या मेळाव्यातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तोफ डागत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

Raj Thackeray : मनसेचा 18 वा वर्धापन (MNS Vardhapan Din) दिन सोहळा आज नाशिकमध्ये पार पडला. या मेळाव्यातून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तोफ डागत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मराठ्यांनो यांच्या भुलपाथांना बळी पडू नका,  अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत राज ठाकरेंनी सरकारचे वाभाडे काढले आहे. 

राज ठाकरे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना सांगितले मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) काही होणार नाही. तांत्रिकदृष्ट्या ते टिकणार नाही, यांच्या भूलथापांना बळी पडू नका. जी गोष्ट होऊ शकत नाही त्याचे आश्वासन सरकार देत आहे. महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य शिक्षण रोजगार देऊ शकत नाही. बाहेरील राज्याचे लोक पोसायची आणि आम्ही आंदोलन करायची. जातीजातीत विष कालवले जात आहे. महाराष्ट्र एकसंघ ठेवत नाही. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलेत हे यांना नकोय. तुमच्यात विष कालविण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप का झाले नाही?

अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत राज ठाकरे म्हणाले की, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप का झाले नाही?, पंतप्रधान फुले वाहून गेले त्याचे पुढे काय झाले? अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा उभा करण्याचा विषय आला तेव्हा मी सांगितले असे होणार नाही. समुद्र आहे तो. तिथे भर घालण्यासाठी किमान 25 ते 30 हजार कोटी लागतील. शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले स्मारक आहे. येणाऱ्या पिढीला पुतळे दाखविणार का? गड किल्ले उभे राहिले तर इतिहास दाखवू शकू. काँग्रेस सरकार, शिवसेना-भाजप आणि आताचे सरकार तेच सांगत आहे, असे वाभाडे त्यांनी काढले आहे. 

सर्व भोंगे एका रात्रीत काढतो

ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजातील लोकांनाही त्रास होतो. त्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकतात? एकदा माझ्या हातात सरकार द्या, सर्व भोंगे एका रात्रीत काढतो, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले आहे. समुद्रात दर्गा बांधत होते. एका रात्रीत ती काढली. पालिका, पोलिसांच्या का लक्षात आलं नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आणखी वाचा 

पेशन्स ठेवा ते माझ्या खांद्यावर माझीच पोरं खेळवणार, राज ठाकरे यांचा शब्द आणि शब्द जसाच्या तसा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget