एक्स्प्लोर

Gold Price : जळगावात सोन्याचे दर पुन्हा विक्रमी पातळीवर;गेल्या 24 तासात 1000 रुपयांची वाढ, प्रतितोळा दर 63500 वर

Gold Price Hike:  ऐन लग्न साराईच्या तोंडावर ही दर वाढ झाल्याने सर्व सामान्य ग्राहकाच्या आवाक्याबाहेर सोने गेल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदीचे प्रमाण कमी केल्याचे पाहायला मिळत आहे.

Gold Price Hike:  देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भावही (Gold Price)  कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ऐन लगीन सराईत सोन्याच्या दराने नवा उच्चांक  गाठला आहे.   जळगावात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची मोठी वाढ झाल्याने सोन्याचे दर पुन्हा एकदा 63500  रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.  

गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे.  आज देखील पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन सोन्याचे दर हे 61900 तर जीएसटीसह 63500 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. जागतिक पातळीवर बँकाच्या व्याज दरात सातत्याने होत असलेलं बदल यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुंतवणूकदार हे सोन्याकडे  वळू लागल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.  त्याचा परिणाम सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे  सोने व्यावसायिक सांगत आहेत.

ऐन लग्न साराईच्या तोंडावर दर वाढ

ऐन लग्न साराईच्या तोंडावर ही दर वाढ झाल्याने सर्व सामान्य ग्राहकाच्या आवाक्याबाहेर सोने गेल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदीचे प्रमाण कमी केल्याचे पाहायला मिळत आहे.  सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसात होत असलेली वाढ पाहता आणि अजूनही सोन्याचे वाढण्याची शक्यता  आहे. अनेक ग्राहकांनी गुंतवणूक म्हणून या वाढत्या दरात ही सोने खरेदी करणे देखील पसंत केले आहे. सोन्याची गुंतवणूक ही कधीही फायदेशीर असल्याचं दावा करत या ग्राहकही वाढत्या सोन्याच्या दरात खरेदीचे समर्थन केल्याचे पाहायला मिळत आहे. तर काहींनी मात्र दुकानात आल्यावर वाढलेले भाव कळल्यानंतर आपल्याला धक्का बसला असल्याचं म्हटले आहे.  न्याच्या दराचा विचार करता आज पर्यंतचा हा सर्वाधिक सोन्याचा भाव असल्याचं मानले जात आहे.

अमेरिकन फेडरल बँकेने आपल्या व्याजविषयक धोरणात जे काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे ते पाहता गुंतवणूक दाराना बँकेत पैशांची गुंतवणूक करण्यापेक्षा सोन्यात गुंतवणूक करणे हे सोईचे आणि सुरक्षित वाटत आहे.  अनेकांनी सोन्याच्या गुंतवणुकीकडे आपला कल वाढवल्याने जागतिक पातळीवर सोन्याच्या  मागणीत मोठी वाढ झाली आहे.

 हे ही वाचा:

Pandharpur:  पुन्हा 'त्याच' अज्ञात महिला भक्ताकडून विठुरायाला दोन किलो सोन्याचे दागिने अर्पण, या आधीही दिले होते 1.80 कोटींचे दागिने

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Arrest Breaking : गेले अनेक दिवस फरार असलेला प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडला?Eknath Shinde And Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आमनेसामने; नेमकं काय घडलं?Shivsainik Bail granted On Kunal Kamraकुणाल कामराच्या सेटची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूरYogesh Kadam On Kunal Kamra CDR : कुणाल कामराला कुणी पैसे दिलेत का? हे तपासणार : योगेश कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
Embed widget