एक्स्प्लोर
Advertisement
प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, पाच दहशतवाद्यांना अटक
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट जम्मू काश्मीर पोलिसांनी उधळून लावला आहे. पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
श्रीनगर : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट जम्मू काश्मीर पोलिसांनी उधळून लावला आहे. जैश-ए- मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांना पोलिसांनी स्फोटकांसह अटक केली आहे. या सर्वांनी प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक केलेल्या या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या, हातबॉम्ब आणि इतर सामग्री जप्त केली आहे. काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनी मोठा घातपात करण्याचा यांचा डाव होता.
पोलिसांच्या माहितीनुसार हे दहशतवादी हजरतबल परिसरात दोन ग्रेनेड हल्ले करण्याचा डाव रचत होते. त्यांच्याजवळून मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. ज्या पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे त्यात सदरबल हजरतबलतील एजाज अहमद शेख, असार कॉलनी हजरतबलमधून उमर हमीद शेख, असार कॉलनीमधील इम्तियाज अहमद चीका उर्फ इमरान, इलाहीबाग सौरातील साहिल फारूक गोज्री आणि सदरबल हजरतबलच्या नसीर अहमद मीरचा समावेश आहे.
या दहशतवाद्यांजवळून एक हातोडी, एक वॉकी टॉकी, तीन बैटरी, एक बॅटरी चार्जर, एक ऑन-ऑफ स्विच, एक पाऊच, तीन क्वायल, तीन पॅकेट स्फोटक सामग्री, एक बॅग, चार टेप रोल आणि एक अडीच लीटरची निट्रिक अॅसिडची बॉटल हस्तगत केली आहे. यासोबत पोलिसांनी 143 जिलेटिन रॉड, सात सेकेंड्री अॅक्सप्लोसिव्ह, एक सायलेंसर, 42 डेटोनेटर्स, एक सीडी ड्राईव्ह देखील जप्त केला आहे.
दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement