Opration Sindhoor मोठी बातमी: भारताचा डबल धमाका, आता थेट लाहोरमध्ये ड्रोन घुसवले, पाकिस्तानचा दावा
Opration Sindhoor: भारताने पाकिस्तानमधील 9 शहरांत ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे.

Opration Sindhoor: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर (Opration Sindhoor) पाकिस्तानमधील मोठमोठी शहरं ड्रोन हल्ल्यानं हादरल्याची पाहायला मिळत आहे. भारताने पाकिस्तानमधील 9 शहरांत ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे. लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे.
पाकिस्तानने नेमका काय दावा केला?
भारताने पाकिस्तानमधील 9 शहरांत ड्रोन हल्ले केले आहे. लाहोर, रावळपिंडी,कराची या शहारांत भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले आहे. लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचा पाकिस्तानने दावा केलाय. गुजरानवाला आणि अटक शहरांवरही भारताकडून ड्रोन हल्ले झाल्याचा दावा पाकिस्तानच्या आयएसपीआरचे महासंचालक ले.जन.अहमद शरीफ यांनी केला आहे. भारताचे 12 ड्रोन पाडल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ होताय व्हायरल-
Utter chaos in #Lahore after drone strike at Walton Road which leads to Lahore cantonment.#AsimMunir's terror policies invited war to Pakistan's streets.
— Yusra Iqbal (@YusraIqbal_) May 8, 2025
The Cost of decades of terror unleashed in india is now being paid in daily installments!#IndiaPakistanWar#OperationSindoor pic.twitter.com/uUSjvmU3R4
Drone strikes in #Lahore, sirens in the night, smoke over Walton Road..
— Hinna Nazir (@HinnaNazir) May 8, 2025
Years of exporting terror have come full circle.
Pakistan’s military elite sowed this whirlwind; now entire #Pakistan paying the price.#IndiaPakistanWar #OperationSindoor#JusticeServed@TinyDhillon pic.twitter.com/LWDOOpJQQv
ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार-
ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार मारल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना दिली अशी सूत्रांची माहिती आहे. आज नवी दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीला ऑपरेशन सिंदूरची विस्तृत माहिती दिली. ऑपरेशन अजूनही संपलेलं नाही, सुरूच आहे असं संरक्षणमंत्री बैठकीत म्हणाल्याची माहिती आहे. ऑपरेशन अजूनही संपलेलं नसल्यामुळे मृत दहशतवाद्यांचा अंतिम आकडा हाती आलेला नाही असं सरकारने विरोधकांना सांगितल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान विरोधी पक्षांनी या कारवाईनंतर लष्कराला संपूर्ण पाठिंबा दर्शवलाय. संकटकाळात सरकार घेईल त्या निर्णयाला आपला पाठिंबा असेल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.
























