Operation Sindoor Sophia Qureshi: सोफिया कुरेशीचा धर्म कोणता, राफेलची किंमत किती, पाकिस्तानकडून गुगलवर सर्च मोहीम!
Operation Sindoor Sophia Qureshi: पाकिस्तानमध्ये गुगलवर सोफिया कुरेशीबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराने आज पत्रकार परिषद घेत आज या संपूर्ण हल्ल्याची माहिती पुराव्यांसह दिली. पाकव्याप्त काश्मिरातील 5 आणि पाकिस्तानातले 4 दहशतवादी तळ भारताने बेचिराख केले. ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर आर्मीच्या कर्नल सोफिया कुरेशी (Col. Sofiya Qureshi) आणि विंग कमांडर व्योमिका सिंह (Wing Commander Vyomika Singh) यांनी काल पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली.
भारतीय लष्कराकडून कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची सगळी माहिती दिली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरचे फोटो आणि व्हिडीओ सादर करत पाकिस्तानचा बुरखा फाडला. आता पाकिस्तानी लोक गुगलवर कर्नल सोफिया कुरेशीचा नेमका कोणता धर्म आहे?, सिंदूरचा अर्थ काय?, भारताकडे एकूण किती राफेल आहे?, हे गुगलवर सर्च करत आहे.
पाकिस्तानकडून गुगलवर सर्च मोहीम-
पाकिस्तानमध्ये गुगलवर सोफिया कुरेशीबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानच्या गुगल ट्रेड्सनूसार पाकिस्तानी नागरिक Sofia Qureshi, Sofia Qureshi Religion आणि Sofia Qureshi Indian Army असं टाकत गुगलवर सर्च करत आहेत. पाकिस्तानी लोक भारतीय लष्कराबाबतही गुगलवर शोधत असल्याची माहिती समोर आली आहे.
भारताकडे किती अणुबॉम्ब आहेत?
ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तानी लोक भारतात पाकिस्तानच्या युद्धाची सध्याची परिस्थिती काय आहे याचा शोध घेत आहेत. याशिवाय, भारताकडे किती अणुबॉम्ब आहेत, जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असलेल्या भारतीय लष्कराच्या प्रमुखाचे नाव काय, याचाही शोध घेतला जात आहे. इंडिया स्टॉक मार्केट, भारतात किती अणुबॉम्ब आहेत, भारत-पाकिस्तान युद्धाची सद्यस्थिती, आर्मी अॅक्ट पाकिस्तान जगातील टॉप 10 एअर फोर्स, इंडियन आर्मी चीफचे नाव, जगातील सर्वात मजबूत आर्मी, भारतीय आर्मी चीफ, मनोज नरवणे, ऑपरेशन सिंदूरमध्ये किती लोक मारले गेले?, असं पाकिस्तानी लोक गुगलवर शोधत आहेत.
राफेल क्षेपणास्त्राची किंमत किती आहे?
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लोक राफेल क्षेपणास्त्राची किंमत किती आहे?, हे देखील गुगलवर सर्च करुन माहिती जाणून घेत आहेत. पाकिस्तानी लोक गुगलवर ऑपरेशन सिंदूरबद्दलही शोधत आहेत. आता सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर, इंडिया ऑपरेशन सिंदूर, सिंदूर हल्ला, ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?, असं गुगलवर टाकून माहिती शोधली जात आहे. तसेच सिंदूर ऑपरेशनचा नेमका अर्थ काय?, हे देखील पाकिस्तानी लोक गुगलवर शोधत आहे. सिंदूर म्हणजे काय, सिंदूरचा अर्थ इत्यादी कीवर्ड शोधले जात आहेत. ऑपरेशन सिंदूर व्यतिरिक्त, पाकिस्तानी लोक भारताबद्दल सतत शोध घेत आहेत.
कोण आहे सोफिया कुरेशी? ( Who IS Colonel Sofia Qureshi )
सोफिया कुरेशी या मूळची गुजरातची आहे. सोफिया कुरेशी यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. एका माहितीनूसार सोफियाचे आजोबा देखील सैन्यात होते आणि तिच्या वडिलांनी काही वर्षे सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणूनही काम केले होते. सोफिया यांनी 1999 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाली. सोफिया यांनी 1999 मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतले. 2006 मध्ये, सोफियाने काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले. 2010 पासून त्या शांतता मोहिमेशी संबंधित आहेत. पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रम दरम्यान तिच्या सेवेबद्दल तिला जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) कडून प्रशंसापत्र देखील मिळाले आहे. ईशान्य भारतातील पूर मदत कार्यादरम्यान तिच्या उत्कृष्ट कामाबद्दल तिला सिग्नल ऑफिसर इन चीफ (एसओ-इन-सी) कडून प्रशंसापत्र देखील मिळाले. कर्नल सोफिया कुरेशी यांनी बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय तुकडीचे नेतृत्व केले तेव्हा त्या देखील चर्चेत आल्या. भारतीय तुकडीचे नेतृत्व करणारी भारतीय लष्करातील सोफिया ही पहिली महिला अधिकारी बनली. या सरावाचे नाव 'एक्सरसाइज फोर्स 18' असे होते. या सरावात कर्नल सोफिया कुरेशी या एकमेव महिला अधिकारी होत्या.
ऑपरेशन सिंदूरची A टू Z माहिती, VIDEO:
संबंधित बातमी:
Opration Sindhoor: पाकिस्तानी रॉकेट थेट भारताच्या हद्दीत; ऑपरेशन सिंदूरनंतर अमृतसरजवळ मोठी घडामोड

























