एक्स्प्लोर
Opration Sindhoor Inside Story: दिल्लीत गुप्त बैठक, अधिकाऱ्यांना केले होते क्वारंटाइन; 21 मधून 9 दहशतवादी अड्डे निश्चित, ऑपरेशन सिंदूरची Inside Story
Opration Sindhoor Inside Story: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवत भारतानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. मात्र या ऑपरेशनची रणनीती कशी आखण्यात आली, याबाबत माहिती समोर आली आहे.
Opration Sindhoor
1/10

ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवत भारतानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. मात्र या ऑपरेशनची रणनीती कशी आखण्यात आली, याबाबत एबीपी माझाच्या हाती माहिती लागली आहे.
2/10

ऑपरेशन सिंदूरसाठी अधिकारी कसे निवडण्यात आले? दहशतवाद्यांचे कोणते अड्डे निवडण्यात आले. दहशतवाद्यांच्या तळाची माहिती कोणी दिली, कोणत्या टप्प्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यात आली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी ईनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
3/10

3 मे रोजी एक अतिशय गुप्त बैठकीत ऑपरेशन सिंदूरची योजना आखण्यात आली. जे अधिकारी हे ऑपरेशन राबवणार होते त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं.
4/10

साऊथ ब्लॉकमध्ये 3 मे रोजी एक अतिशय गुप्त बैठक झाली. साऊथ ब्लॉकच्या बैठकीत तिन्ही सेनादल प्रमुख,राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी झाले होते
5/10

तिन्ही सेनादलांनी ऑपरेशन सिंदूरचे अधिकारी निवडले. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरसाठीच्या अधिकाऱ्यांना साऊथ ब्लॉकमध्येच क्वारंटाइन केले.
6/10

रॉ आणि एनएसएकडून पाकच्या 21 दहशतवादी अड्ड्यांची यादी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सादर केली. यानंतर अजित डोवाल आणि त्यांच्या टीमकडून दहशतवाद्यांचे 9 अड्डे निश्चित केले.
7/10

5 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून डोवाल यांनी हल्ल्याचा प्लॅन दिला. डोवाल यांचा प्लॅन पाहून नरेंद्र मोदींकडून मंजुरी मिळाली.
8/10

6 मे ऑपरेशन सिंदूर रात्री 1 वाजता राबवण्याचा निर्णय घेण्यातआला. ठरल्याप्रमाणं 1 वाजल्यापासून लढाऊ विमानांचे हल्ले सुरू करण्यात आले.
9/10

9 दहशतवाद्यांवर अड्ड्यांवर भारताकडून 24 हल्ले करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हल्ल्याच्या प्रत्येक घडामोडीवर नजर होती.
10/10

7 मे रोजी पाकिस्तानात हल्ले केल्याची पहाटे 1.44 वा. भारताकडून घोषणा करण्यात आली.
Published at : 08 May 2025 01:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
विश्व
























