एक्स्प्लोर

India targeted Pakistan Air Defence Systems मोठी बातमी: भारताची लाहोरपर्यंत मुसंडी, पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त, ड्रोन हल्ल्यांनी पाकला हादरवून सोडलं!

India targeted Pakistan Air Defence Systems: भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली आहे.

India targeted Pakistan Air Defence Systems: ऑपरेशन सिंदूरनंतर (Opration Sindhoor) पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त  (Pakistan Air Defence Radars And Systems Destroyed) केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या 15 ठिकाणी भारतीय लष्कराचे तळ लक्ष करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला. आम्ही हाणून पाडला. डेब्रिज गोळा करण्याचे काम सुरू आहे,  अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने 7 आणि 8 मे2025 च्या रात्री अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियाना भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशननं (CPMIEC) विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा (Surface-to-Air Missile – SAM) करणारी क्षेपणास्त्र (SAM) प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केलेला.

भारतीय लष्कराने कोणती माहिती दिली?

ऑपरेशन सिंदूर संदर्भात 7 मे 2025 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईला केवळ लक्ष्य केंद्रीत (Focused), मोजकी (measured) आणि तणाव न वाढवणारी (non-escalatory) अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते. पाकिस्तानातील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेले नाही, हेही ठामपणे सांगण्यात आले होते. भारतातील लष्करी ठिकाणांवर कोणताही हल्ला झाल्यास त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, हेही पुन्हा अधोरेखित करण्यात आले.

पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न-

७ आणि ८ मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानने अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फाळोदी, उत्तरलाई आणि भुज यांसारख्या उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या सर्व हल्ल्यांना इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने यशस्वीरित्या निष्प्रभ केले. या हल्ल्यांचे अवशेष अनेक ठिकाणी सापडले असून, पाकिस्तानी हल्ल्याचा पुरावा म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे.

भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील एअर डिफेन्स रडार टार्गेटवर-

आज सकाळी भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील एअर डिफेन्स रडार आणि सिस्टम वर टार्गेट हल्ले केले. पाकिस्तानच्या कारवाईच्या समान क्षेत्रात आणि तीव्रतेतच भारताने प्रत्युत्तर दिले आहे. लाहोरमधील एक एअर डिफेन्स सिस्टम निष्क्रिय करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ, मेंढर आणि राजौरी या जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील भागांमध्ये मोर्तार आणि जड तोफखाना वापरून बिनप्रवोक हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. या हल्ल्यांमुळे १६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये तीन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. या परिस्थितीत पाकिस्तानचा मोर्तार आणि तोफगोळ्यांचा मारा थांबवण्यासाठी भारताला कारवाई करावी लागली. भारतीय सैन्य तणाव वाढवण्याच्या विरोधात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करते, परंतु ही भूमिका पाकिस्तानच्या लष्करानेही पाळली पाहिजे.

भारताने उद्ध्वस्त केलेली पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण यंत्रणा नेमकी काय? 

- HQ-9 ही चीनने (CPMIEC) विकसित केलेली सुरक्षा यंत्रणा आहे. 

- हवाई हल्ले रोखणे आणि प्रतिकार करण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाते. 

- एकाचवेळी 100 टार्गेट ट्रॅक करुन ते उद्ध्वस्त करण्याची क्षमता या यंत्रणेची होती, हीच यंत्रणा भारताने उद्ध्वस्त केली

- जमिनीवरुन हवेत  मारा करणारी (Surface-to-Air Missile – SAM) क्षेपणास्त्र (SAM) प्रणाली आहे. 

- ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते. 

- 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केला होता. 

- राफेल, सुखोई आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसारख्या भारताच्या हवाई धोक्यांना रोखसाठी पाकिस्तानने चीनकडून यंत्रणा घेतली होती.

भारताच्या सुदर्शन चक्र, S-400 क्षेपणास्त्राने पाकिस्तानचा डाव उधळून लावला, काय आहे सुदर्शन चक्र S-400?

- S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते. ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात सक्षम आहे.

- भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली आहे.

- ही मिसाईल अत्याधुनिक फाइटर जेट्सलाही मारून पाडण्याची क्षमता ठेवते.

- S-400 एकावेळी 72 मिसाईल्स लाँच करू शकते.

- ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करू शकते.

- S-400 मिसाईल सिस्टीमची ताकद:

- S-400 ला जगातील सर्वोत्तम एअर डिफेन्स सिस्टीम मानले जाते.

- ही सिस्टीम रशियाने तयार केली आहे.

- सुमारे 5 अब्ज डॉलर्सच्या करारानंतर 2018 मध्ये भारताने ही मिसाईल सिस्टीम खरेदी केली.

- या करारात भारताने 5 युनिट S-400 मिसाईल सिस्टीम्स खरेदी केल्या.

- S-400 ही मोबाईल लाँग-रेंज सर्फेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे.

- ही प्रणाली स्टेल्थ फाइटर जेट, बॉम्बर्स, क्रूज व बॅलिस्टिक मिसाईल्स आणि UAV (ड्रोन) यांना लक्ष्य करू शकते.

- यात चार वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स असतात, ज्या 400 किमी अंतरावरील टार्गेटवर हल्ला करू शकतात.

- यात दोन स्वतंत्र रडार सिस्टीम्स आहेत, ज्या 600  किमीपर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा शोध घेऊ शकतात.

- एकावेळी 80 हवाई टार्गेट्स वर नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकते.

- सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर केवळ 3 मिनिटांत फायरिंगसाठी तयार होते. यामुळे शत्रूचा हल्ला तत्काळ निष्फळ केला जाऊ शकतो.

एअर डिफेन्स रडार सिस्टिम म्हणजे काय, नेमकी काम कशी करते?

HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशननं (CPMIEC) विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा (Surface-to-Air Missile – SAM) करणारी क्षेपणास्त्र (SAM) प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केलेला. याची रेंज 125 ते 200 किलोमीटर असल्याचं सांगितलं जातंय. त्यात एकाच वेळी 100 लक्ष्यांचा मागोवा घेण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान खूपच चिंतेत पडलं होतं. त्यामुळे त्यांनी तात्काळ  HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला. भारताची राफेल लढाऊ विमानं, सुखोई एसयू-30 एमकेआय आणि ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ही पाकिस्तानसाठी मोठी आव्हानं ठरणार आहेत. त्यामुळेच पाकिस्ताननं HQ-9 सारख्या क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पण, आता भारतानं ड्रोनमार्फत पाकिस्तानची HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली उद्ध्वस्त केल्यामुळे आता पाकिस्तानची चिंता वाढली आहे. पाकिस्तानी लोक चीनच्या HQ-9 ची तुलना भारताच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीशी करतात. पाकिस्तानी काहीही म्हणोत, पण सत्य हे आहे की, पाकिस्तानला चीनकडून मिळालेली HQ-9 एअर डिफेन्स सिस्टिम तांत्रिकदृष्ट्या S-400 समोर अजिबात टिकू शकत नाही. दोघांची तुलना करणंही वेळ वाया घालवण्यासारखं आहे. HQ-9 ची रडार प्रणाली भारताच्या ब्राह्मोस सारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकेल, याचा विचार करणंही अशक्य आहे. S-400 ची मारा करण्याची क्षमता 400 किलोमीटर आहे आणि ती खूप कमी वेळात कार्यान्वित होऊ शकते. त्या तुलनेत, HQ-9 तैनात करण्यासाठी फक्त अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो.

लाहोरमधील अमेरिकन नागरिकांना हाय अलर्ट-

पाकिस्तानमधील पंजाबच्या लाहोरमधील अमेरिकन नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. अमेरिकेच्या लाहोरस्थित वाणिज्यदूतावासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमेरिकेने त्यांच्या पाकिस्तानमधील नागरिकांना दिलेल्या या सूचनांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध अटळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी लाहोरमध्ये कुठेही फिरू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लाहोरच्या विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर हा रिकामा केला जाऊ शकतो असंही अमेरिकेने सांगितलं आहे. पाकिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी प्लॅन तयार करा, सर्व आवश्यक कागदपत्रं तयार ठेवा असंही अमेरिकेने सांगितलं आहे. कुणाच्याही मदतीच्या भरवशावर थांबू नका. स्थानिक माध्यमांतील बातम्यांवर लक्ष ठेवा असंही सांगण्यात आलं आहे. 

संबंधित बातमी:

Opration Sindhoor Inside Story: दिल्लीत गुप्त बैठक, अधिकाऱ्यांना केले होते क्वारंटाइन; 21 मधून 9 दहशतवादी अड्डे निश्चित, ऑपरेशन सिंदूरची Inside Story

Operation Sindoor Sophia Qureshi: सोफिया कुरेशीचा धर्म कोणता, राफेलची किंमत किती, पाकिस्तानकडून गुगलवर सर्च मोहीम!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
Embed widget