Coronavirus : मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या वापराला परवानगी द्या; Zydus ची DCGI कडे मागणी
अमेरिकेत आणि युरोपमध्ये मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीचा (Monoclonal Antibodies) मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. भारतातही याच्या वापराला परवानगी मिळाली तर ते कोरोना विरोधातल्या लढाईमध्ये मोठं पाऊल असणार आहे.
![Coronavirus : मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या वापराला परवानगी द्या; Zydus ची DCGI कडे मागणी Zydus seeks DCGI approval to undertake clinical trials for monoclonal antibodies cocktail Coronavirus : मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या वापराला परवानगी द्या; Zydus ची DCGI कडे मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/14/46945a5aca48373eadf256de68451738_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : कोरोना विरोधातल्या लढाईमध्ये एक महत्वाचं हत्यार म्हणून पुढं येत असलेल्या मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या चाचणीला ( ZRC-3308) परवानगी मिळावी अशी विनंती झायडसने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) केली आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीचा वापर अमेरिकेत आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या डोसनंतर कोरोना रुग्णाला रुग्णालयात भरती होण्याची गरज नसते. तसेच या डोसमुळे कोरोना होण्याचीही शक्यता अत्यंत कमी आहे.
Zydus seeks DCGI approval to undertake clinical trials for monoclonal antibodies cocktail that can neutralise #COVID infection: Zydus Cadila
— ANI (@ANI) May 27, 2021
मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी म्हणजेच ज्याला कॉकटेल ड्रग्ज म्हटलं जातं त्याचा वापर आता भारतात काही ठिकाणी सुरु करण्यात येत आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी घेतल्यास लोकांना कोरनाची लागण होण्याचा धोका अत्यंत कमी असतो हे अनेक अभ्यासातून सिद्ध झालंय. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी हे कोरोना विरोधातील प्रमुख हत्यार आहे असं मत अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. भारतात सिप्ला आणि स्वित्झरलॅन्डची कंपनी रॉश या दोन कंपन्यां एकत्र येऊन मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीची निर्मिती करत आहेत.
काय आहे मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी?
मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी हे एक कॉकटेल ड्रग्ज आहे की जे घेतल्यानंतर कोरोना रुग्णाची प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये Casirivimab आणि Imdevimab या दोन औषधांचा समावेश आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीमुळे कोरोना मानवी शरीरात पसरत नाही, कारण त्याला आवश्यक ते खाद्य मिळत नाही.
एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्याला हे मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी तीन दिवसांच्या आत द्यावं लागतं. हे एक प्रकारचं इम्युनिटी बुस्टर आहे. त्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो. तसेच त्याला रुग्णालयात भरती होण्याचीही गरज राहत नाही. भारतात रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत असताना याच्या वापराला परवानगी मिळाली तर मोठं यश असणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलं होतं मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या वर्षी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीचा डोस घेतला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांच्या भेटीनंतर संभाजीराजे म्हणाले...
- Corona : 'या' सूचनांचं पालन केलं तर 1 जुलैला कोरोना संपणार; डॉ. रवी गोडसेंचा दावा
- Coronavirus Cases India : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात काहीसा दिलासा; देशात गेल्या 24 तासांत 2.11 लाख नवे कोरोनाबाधित
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)