![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Corona : 'या' सूचनांचं पालन केलं तर 1 जुलैला कोरोना संपणार; डॉ. रवी गोडसेंचा दावा
डॉ. रवी गोडसे (Dr. Ravi Godse ) यांनी भारत सरकारला कोरोनासंबंधी पाच सूचना केल्या आहेत. त्यांचे पालन केल्यास 1 जुलैपर्यंत भारतातून कोरोना संपणार असा दावा त्यांनी केलाय.
![Corona : 'या' सूचनांचं पालन केलं तर 1 जुलैला कोरोना संपणार; डॉ. रवी गोडसेंचा दावा Dr Ravi Godse suggested 5 point plan claims by 1 July end Pandemic October shed masks 3rd wave bye bye Corona : 'या' सूचनांचं पालन केलं तर 1 जुलैला कोरोना संपणार; डॉ. रवी गोडसेंचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/27/142e62bdbdb36acb8aea34da11f1802c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आपण सांगितलेल्या पाच गोष्टींची अंमलबजावणी केली तर एक जुलैला भारतातून कोरोना संपणार, लोकांना मास्कचा वापर करावा लागणार नाही आणि तिसऱ्या लाटेचा काही धोका नाही असा दावा भारतीय वंशाचे अमेरिकेतील पेनिसेल्वेनियात डॉक्टर असलेल्या रवी गोडसेंनी केला आहे.
डॉ. रवी गोडसे हे ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. कोरोना संबंधी त्यांनी या आधीही व्हिडीओंच्या माध्यमातून अनेक सूचना केल्या आहेत. आता त्यांनी भारत सरकारसाठी पाच सूचना केल्या आहेत. त्यांचं जर पालन केलं तर येत्या 1 जुलैपर्यंत भारतातील कोरोना संपणार, ऑक्टोबरपर्यंत लोकांनी मास्क वापरायची गरज भासणार नाही तर भारतात कोरोनाची तिसरी लाटच येणार नाही असा दावा त्यांनी केला आहे.
1 July - end Pandemic. 2 October- shed masks. 3 rd wave- bye bye.
— DrRavi (@DrGodseRavi1) May 26, 2021
डॉ. रवी गोडसे यांनी केलेल्या पाच सूचना काय आहेत त्या पाहू,
1. दररोज पत्रकार परिषद घेऊन जनतेला कोरोनाबद्दल अधिकृत माहिती द्या.
2. जेवढ्या काही लसी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत त्या सर्वांच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्या.
3. लसीकरण असेल वा कोरोनाचे उपचार, खासगी क्षेत्रालाही त्याची परवानगी द्या. त्यामुळे गती वाढेल.
4. प्रोटोकॉलनुसार मोनोक्लोनल प्रक्रियेला परवानगी द्या. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल. अमेरिकेत मोनोक्लोनलला गेल्या वर्षीच परवानगी देण्यात आली आहे.
5. लाल फितीचा कारभार बंद करा आणि सर्वांचं लसीकरण करा.
जर मी या दिलेल्या तारखा खोट्या ठरवायच्या नसतील तर या सूचनांचं लगेच पालन करा असंही डॉ. रवी गोडसे म्हणाले.
Start my 5 point plan today. 1) Daily press conference 2) At risk approval all vaccines 3) Privatize access 4) Monoclonal per enclosed protocol- Mona darling, it’s simple 5) No red tape. Find arms. Stick needles. Don’t document. Unless you want to prove my dates wrong, pl do it.
— DrRavi (@DrGodseRavi1) May 26, 2021
लहान मुलांना धोका?
देशभर कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचं सांगण्यात येतंय. यावर डॉ. रवी गोडसे म्हणाले की, "जरी तिसरी लाट आली नाही तरी लहान मुलांना थोडासा धोका आहेच. आतापर्यंत घरी बसलेली मुलं अचानक ग्राऊंडवर खेळायला गेली तर त्यांना कमी असेना पण काही प्रमाणात धोका आहे."
महत्वाच्या बातम्या :
- The Lancet : लस खरेदीसाठी केंद्रीय व्यवस्था तयार करा; लॅन्सेट सिटिझन्स पॅनेलच्या भारताला आठ शिफारशी
- Coronavirus Cases India : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात काहीसा दिलासा; देशात गेल्या 24 तासांत 2.11 लाख नवे कोरोनाबाधित
- Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांच्या भेटीनंतर संभाजीराजे म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)