एक्स्प्लोर
‘ताजमहल भारतीय मजुरांनी उभारला, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आमचीच’
ताजमहल ही वास्तू भारतीय मजुरांनी उभारली, त्यामुळे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार संगीत सोम यांच्या ताजमहलबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानं योगी सरकारवर टीकेची झोड उठत आहे. त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप आमदाराकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. शिवाय, ताजमहल ही वास्तू भारतीय मजुरांनी उभारली, त्यामुळे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.
चार दिवसांच्या गोरखपूरच्या दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ताजमहलबाबत उत्तर प्रदेश सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, "ताजमहलची उभारणी कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली हे महत्त्वाचं नाही. पण त्या वास्तूची उभारणी भारतीय मजुरांनी केली आहे. त्यामुळे त्याच्या रक्षणाची जबाबदारी आमचीच आहे."
योगी पुढे म्हणाले की, "पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ताजमहलचं अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे तिथे पर्यटकांना सोईसुविधा आणि सुरक्षा उपलब्ध करुन देणं आमची जबाबदारी आहे."
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील मेरठचे भाजप आमदार संगीत सोम यांनी ऐतिहासिक ताजमहल वास्तूला भारतीय संस्कृतीवर काळा डाग असल्याचं वक्तव्य केलं होतं. सोम यांच्या वक्तव्यांचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसींकडून पलटवार
संगीत सोम यांच्या या वक्तव्याचा MIM खासदार असदुद्दीन ओवेसींनी निषेध करताना, "जर असं असेल, तर लाल किल्लाही गद्दारांचं निशाण आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकणार का?" असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला होता.
भाजप नेत्यांकडून सोम यांचं समर्थन
तर दुसरीकडे भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी संगीत सोम यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं. भारतीय इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न झालं आहे. हे स्मारक विध्वसांचं प्रतिक आहे. त्यामुळे संगीत सोम यांनी मांडलेलं मत हे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येक वक्तव्याबाबत पक्षाची प्रतिक्रिया आवश्यक नसते, असं जीव्हीएल नरसिंह राव म्हणाले होते.
संबंधित बातम्या
ताजमहल हा भारतीय संस्कृतीवरील डाग: भाजप आमदार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement