एक्स्प्लोर
Advertisement
देशभरात योग दिनाचा उत्साह, अनेक ठिकाणी योग कार्यक्रमाचं आयोजन
मुंबई: आज आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. देशातही वेगवेगळ्या ठिकाणी योगचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लखनौमध्ये पंतप्रधान मोदी तर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांसोबत योग केला.
देशभरात योगचे कार्यक्रम कुठे-कुठे?
मुंबई: मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसोबतच भाजप नेत्या शायना एनसी यांनी सकाळी 6.30 वा. मरीन ड्राईव्हवर योग केला. यावेळी अरबाज खान, मलायका अरोरा आणि इतरही बरेच सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
मुंबई: योग दिनानिमित्त आज आयएनएस विराटवर नौदलाच्या जवानांनी योग केला.
नागपूर: केंद्रीय दळणवळण मंत्री नीतिन गडकरी यांनी नागपूरमधील यशवंत स्टेडियममध्ये योगसाठी हजेरी लावली होती.
दिल्ली: राष्ट्रपती भवनातील आयोजित सामूहिक योग कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं.
श्रीनगर: श्रीनगरच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये आज सकाळी 6.30 वाजता योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
जयपूर: राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सवाई मानसिंह स्टेडिअममध्ये योग कार्यक्रमाला हजेरी लावली.
भोपाळ: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भोपाळच्या लाल परेड ग्राऊंडवर सकाळी 6.30 वा योग केला.
पटना: पटनातील कंकडबागमधील शिवाजी पार्कमध्ये 6.30 वा. योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
जम्मू: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सकाळी 5.30 वा योग शिबिरात हजेरी लावली.
मणिपूर: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे मणिपूरमध्ये योग कार्यक्रमात उपस्थित होते.
सिक्कीम: केंद्रीय गृहराज्य मंत्री किरन रिजिजू यांनी गंगटोकमध्ये योग केला.
चंदीगढ: केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी चंदीगढमध्ये योग कार्यक्रमाला हजेरी लावली.
शिमला: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हिमाचल प्रदेशच्या सुजानपूरमध्ये योग कार्यक्रमात योग केला
विशाखापट्टणम: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विशाखपट्टणममध्ये योग केला.
संबंधित बातम्या:
LIVE UPDATE : जगभरात योग दिनाचा उत्साह
LIVE : आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान मोदींचा लखनौत योग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement