एक्स्प्लोर
अजित दोभाल देशातील सर्वात शक्तिशाली नोकरशाह बनले!
एसपीजीच्या पुनर्गठनामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांना राष्ट्रीय सुरक्षा रणनीतीच्या रचनेत सर्वात वर नेऊन ठेवलं आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोभाल नव्या जबाबदारीसह अधिक शक्तिशाली नोकरशाह बनले आहेत. रणनीती धोरण गटाचं (एसपीजी) नेतृत्त्व कॅबिनेट सचिवाऐवजी आता अजित दोभाल करणार आहेत. बाह्य, अंतर्गत आणि आर्थिक सुरक्षेप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एनएससी) मदतीसाठी 1999 मध्ये याची स्थापना झाली होती.
1999 मध्ये एसपीजीच्या स्थापनेसाठी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं होतं की, कॅबिनेट सचिव याचे अध्यक्ष असतील. पण मोदी सरकारने 11 सप्टेंबर रोजी जारी केलेली अधिसूचना आणि 8 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या गॅझेटनुसार, आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे एसपीजीचे अध्यक्ष असतील. रणनीती धोरण गटामध्ये सुरुवातीला 16 सदस्य होते आता त्यात 18 असतील. यामध्ये कॅबिनेट सचिव आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष यांना दोन नव्या सदस्यांच्या स्वरुपात सामील करण्यात आलं आहे.
लष्करप्रमुख, नौदलप्रमुख, वायूसेनाप्रमुख, आरबीआय गव्हर्नर, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव, गृह मंत्रालयाचे सचिव, अर्थ मंत्रालयाचे सचिव, डिफेन्स प्रॉडक्शनचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, अणुऊर्जा खात्याचे सचिव, अंतराळ विभागाचे सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव याशिवाय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार, मंत्रिमंडळ सचिवालयाचे सचिव आणि गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख यांचा एसपीजीमध्ये समावेश आहे.
एसपीजीच्या पुनर्गठनामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांना राष्ट्रीय सुरक्षा रणनीतीच्या रचनेत सर्वात वर नेऊन ठेवलं आहे. सरकारने एनएसएच्या नेतृत्त्वात नव्या थिंक टँक 'संरक्षण नियोजन समिती'चीही घोषणा केली आहे, जी भारतीय सैन्य आणि सुरक्षा डावपेच तसंच परदेशांसोबत होणाऱ्या सुरक्षा कराराबाबत रणनीती तयार करेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement