(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sofia Firdous : पेशाने इंजिनियर अन् स्वातंत्र्यानंतर ओडिशात निवडून आलेल्या पहिल्या मुस्लिम महिला आमदार; कोण आहेत सोफिया फिरदौस?
सोफिया विद्यमान आमदार मोहम्मद मोकीम यांची मुलगी आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सोफिया यांनी भाजपच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ पूर्ण चंद्र महापात्रा यांचा 8 हजार मतांनी पराभव केला.
Sofia Firdous : ओडिशाच्या बाराबती-कटक मतदारसंघातील काँग्रेस आमदार सोफिया फिरदौस (Sofia Firdous) यांनी इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले आहे. स्वातंत्र्यानंतर ओडिशा विधानसभेत निवडून आलेल्या त्या पहिल्या मुस्लिम महिला आमदार आहेत. सोफिया विद्यमान आमदार मोहम्मद मोकीम यांची मुलगी आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सोफिया यांनी भाजपच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ पूर्ण चंद्र महापात्रा यांचा 8 हजार मतांनी पराभव केला. सोफिया फिरदौस यांनी 52 वर्षांनंतर काँग्रेसकडून ही जागा जिंकली आहे. त्याचवेळी या विधानसभा निवडणुकीत सोफिया यांना 53,197 मते मिळाली, तर भाजपचे प्रसिद्ध डॉक्टर पूर्ण चंद्र महापात्रा यांना 45,223 मते मिळाली. बीजेडीचे प्रकाश बेहरा 39,934 मते मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिले.
View this post on Instagram
जाणून घ्या कोण आहे सोफिया फिरदौस?
३२ वर्षीय सोफिया फिरदौस या राजकीय कुटुंबातील आहेत. सोफिया ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद मोकीम यांची मुलगी आहे. 2024 च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोकीमच्या जागी सोफिया फिरदौस यांना उमेदवारी दिली होती. सोफिया व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असून एका रिअल इस्टेट फर्मच्या संचालक आहेत. 2022 मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरू येथून एक्झिक्युटिव्ह जनरल मॅनेजमेंट प्रोग्राम देखील पूर्ण केला. सोफियाची 2023 मध्ये कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या भुवनेश्वर चॅप्टरच्या अध्यक्षपदी निवड झाली. सोफिया यांनी बिझनेसमन शेख मेराज उल हकसोबत लग्न केलं आहे.
କଟକ ସହର ବାସୀଙ୍କର ସଦ୍ଦିଚ୍ଛା ଓ ସହଯୋଗ ଆମର ସବୁଠାରୁ ବଡ଼ ସମ୍ବଳ । ସେହି ସମ୍ବଳକୁ ଆଧାରକରି ଆମ ସଂଗ୍ରାମ ଓ ସଂକଳ୍ପର ଯାତ୍ରା । pic.twitter.com/b7Wl9KHiRW
— Sofia Firdous (@sofiafirdous1) May 23, 2024
सोफियांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग
सोफिया फिरदौस नेहमीच सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभागी राहिल्या आहेत. निवडणूक प्रचारातही त्यांनी वडिलांना अनेकदा मदत केली. कर्ज फसवणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोकीम यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेसने सोफिया यांना या जागेवरून उमेदवारी दिली.
सोफिया ओडिशाच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल ठेवते
सोफिया फिरदौस यांनी 1972 मध्ये याच विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. 2024 च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने 147 पैकी 78 जागा जिंकून बहुमत मिळवले आणि राज्यातील मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि बिजू जनता दलाची 24 वर्षांची सत्ता नेस्तनाबूत करून टाकली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या