शाळेचं पुस्तक पाहून सेहवाग भडकला
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने शाळेच्या प्राथमिक वर्गातील पाठ्यपुस्तकावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने शाळेच्या प्राथमिक वर्गातील पाठ्यपुस्तकावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. सेहवागने या पुस्तकातील काही मजकुरावर आक्षेप घेत याबाबत राग व्यक्त केला आहे.
प्राथमिक वर्गाच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना चुकीचं शिक्षण दिलं जात आहे. मोठं कुटुंब कधीच आनंदी राहू शकत नाही, असं या पाठ्यपुस्तकात म्हटलं आहे. एका मोठ्या कुटुंबात आई-वडील, आजी-आजोबा आणि अनेक मुलं असतात. त्यामुळे ते एकत्र आनंदी राहू शकत नाहीत, असं लिहिलं आहे. याच मजकुरावर सेहवागने आक्षेप घेतला आहे.
सेहवागने ट्वीट करत म्हटलं की, "या शाळेच्या पुस्तकात अनेक चुकीच्या गोष्टी लिहिल्या आहेत. यावरून या पुस्तक निर्मितीसाठी काम करणाऱ्यांनी किती निष्काळजीपणा दाखवला आहे, हे स्पष्ट होतं. संबधीत विभागातील कर्मचारी आपल्या कामाच्या आधी काहीच अभ्यास करत नाहीत, हे यातून दिसत आहे."
A lot of such crap in school textbooks. Clearly the authorities deciding and reviewing content not doing their homework pic.twitter.com/ftaMRupJdx
— Virender Sehwag (@virendersehwag) August 5, 2018
सेहवान सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच विविध विषयांवर आपली भूमिका मांडत असतो. अनेक गंभीर विषयांवर सेहवागने त्यांच मत मांडल आहे. त्यामुळे सेहवाग सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असतो.























