एक्स्प्लोर
व्हायरल सत्य : 'सोनम गुप्ता बेवफा है' हा नोटाबंदीचा कोडवर्ड होता?
मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयानंतर सोनम गुप्ता या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. 'सोनम गुप्ता बेवफा है', असं लिहिलेल्या अनेक नोटा पाहायल्या मिळाल्या. यानंतर सोनम गुप्ताचा शोध सुरु झाला. पण सोनम गुप्ताबाबत सोशल मीडियावर एक नवी थिएरी मांडली जात आहे. सोनम गुप्ता हा नोटाबंदीचा कोडवर्ड आहे, असा दावा केला जात आहे. या दाव्याला दुजोरा देण्यासाठी 1974 च्या आण्विक चाचणीच्या सिक्रेट कोडवर्डचा दाखला दिला जात आहे.
एबीपी माझाची संलग्न वाहिनी एबीपी न्यूजने या व्हायरल दाव्याची पडताळणी केली आहे.
1974 मध्ये पोखरणमध्ये आण्विक चाचणी करुन भारताने संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवून दिली होती. आता 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा रोखण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या. यानंतर सोशल मीडियावर सोनम गुप्ताचं एक रहस्य समोर आलं. आता तुम्ही विचार करत असाल की या दोघांमध्ये काय संबंध? पण संबंध आम्ही नाही तर सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या एका मेसेजने जोडला आहे.
व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, ज्या पद्धतीने आण्विक चाचणीच्या गुप्त ऑपरेशनचा कोडवर्ड होता, त्याचप्रकारे नोटाबंदीचाही कोडवर्ड होता. या कोडवर्डचं नाव होतं, "सोनम गुप्ता बेवफा है."
देशात मोठ्या निर्णयांसाठी नेहमीच कोणता ना कोणता कोडवर्ड ठेवला जातो. 1974 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पोखरणमध्ये आण्विक चाचणी केली होती, तेव्हा 'बुद्धा स्मायलिंग' असा कोडवर्ड होता.
व्हायरल मेसेजमधील दाव्यानुसार, नोटाबंदीची योजना गुप्त ठेवण्यासाठी एका कोडवर्डचा वापर केला होता, जेणेकरुन या प्लॅनशी संबंधित लोकांशिवाय इतर कोणालाही याची माहिती मिळू नये. जसा पोखरण आण्विक चाचणीचा कोडवर्ड "बुद्ध हसतो आहे" हा होता, तसाच नोटाबंदीचा कोडवर्ड "सोनम गुप्ता बेवफा है" होता.
व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये कोडवर्डचा अर्थही समजावण्यात आला आहे.
- सोनम – संपत्ती (मोठ्या नोटा)
- गुप्ता – गुप्त (काळा पैसा)
- बेवफा आहे – रद्द होणार आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement