uttarakhand BJP : उत्तराखंडमध्ये भाजपचा शपथविधी सोहळा जंगी होणार, मात्र मुख्यमंत्रीपदाचे नाव गुलदस्त्यात...
उत्तराखंडमध्ये शपथविधी सोहळा जंगी करण्याची तयारी भाजपने सुरु केलीय.शपथविधी सोहळा राजभवनाऐवजी डेहराडूनच्या परेड ग्राऊंडवर होणार आहे.
![uttarakhand BJP : उत्तराखंडमध्ये भाजपचा शपथविधी सोहळा जंगी होणार, मात्र मुख्यमंत्रीपदाचे नाव गुलदस्त्यात... uttarakhand oath taking ceremony will be held at parade ground not in raj bhavan suspense on cm uttarakhand BJP : उत्तराखंडमध्ये भाजपचा शपथविधी सोहळा जंगी होणार, मात्र मुख्यमंत्रीपदाचे नाव गुलदस्त्यात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/20/370a6dac98591db2f24a6a84dfbbac3c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
uttarakhand BJP : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चार राज्यात चांगलं यश मिळालं आहे. पंजाब वगळत अन्य चार राज्यात भाजप सत्ता स्थापन करणार आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये शपथविधी सोहळा जंगी करण्याची तयारी भाजपने सुरु केलीय. राज्यात पुन्हा भाजपला प्रचंड बहुमत मिळाले असून, हे ऐतिहासिक आहे. त्यामुळं भाजप हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात प्रदेश सरचिटणीस (संघटन) अजय कुमार यांनी भारतीय जनता पक्षाच्या डेहराडून येथील राज्य मुख्यालयात बैठक घेतली. हा शपथविधी सोहळा राजभवनाऐवजी डेहराडूनच्या परेड ग्राऊंडवर होणार आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपला जनादेश मिळाला असला तरी तिथे गड आला पण सिंह गेला अशीच स्थिती झाली आहे. कारण, मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे अशा स्थितीत भाजप त्यांना पुन्हा संधी देणार की मुख्यमंत्र्यांच्या रुपाने नवा चेहरा समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत या नावांची चर्चा
पुष्कर सिंह धामी
आरोग्य मंत्री धनसिंग रावत
सतपाल महाराज
भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक
माजी मुख्यमंत्री भवन खंडुरी यांच्या कन्या रितू खंडुरी
मसुरीचे आमदार गणेश जोशी
यावेळीचा शपथविधी सोहळा राजभवनाऐवजी डेहराडूनच्या परेड ग्राऊंडवर होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे.
या शपथविधी सोहळ्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सर्व वरिष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे प्रदेश सरचिटणीस कुलदीप कुमार यांनी सांगितले. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. राजनाथ सिंह आणि मीनाक्षी लेखी 21 मार्च रोजी केंद्रातून निरीक्षक म्हणून डेहराडूनला पोहोचतील. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Congress : पराभव झालेल्या पाच राज्यांमध्ये संघटनात्मक बदलाच्या हालचाली सुरू, वरिष्ठ नेत्यांवर सोपवली जबाबदारी
- Congress : पराभव जिव्हारी..., राजीनामा द्या! पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा; सोनिया गांधींचा आदेश
- राहुल गांधींकडेच पुन्हा नेतृत्व सोपवा, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मागणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)