एक्स्प्लोर

TMC Candidate List : ममता बॅनर्जींचा धमाका, विधानसभेसाठी एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर

TMC Candidate List : ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत तृणमूलच्या (TMC Candidate List 2026) सर्वच्या सर्व उमेदवारांची यादी एका झटक्यात जाहीर केली. पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 294 जागांपैकी 291 जागा तृणमूल काँग्रेस (West Bengal Vidhan Sabha Election) लढणार आहे

TMC Candidate List कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Election 2026) जाहीर झाल्यानंतर, आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पुढची पावलं टाकायला सुरुवात केली आहेत. कारण ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत तृणमूलच्या (TMC Candidate List 2026) सर्वच्या सर्व उमेदवारांची यादी एका झटक्यात जाहीर केली. पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 294 जागांपैकी 291 जागा तृणमूल काँग्रेस (West Bengal Vidhan Sabha Election) लढणार आहे. तर उर्वरीत तीन जागा त्यांचा सहकारी पक्ष भारतीय गोरखा प्रजातांत्रिक मोर्चा लढवणार आहे. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालसह (West bengal) तामिळनाडू आसाम, पुद्दुचेरी आणि केरळ या 5 राज्यात निवडणुका (5 states Vidhan Sabha Election 2026) होत आहेत. प. बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत असून 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान तर 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. 

ममता बॅनर्जी भवानीपूरमधून लढणार, नंदीग्राममधून कोण? (Mamata Banerjee constituency Bhabanipur)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून (Bhabanipur Vidhan Sabha) निवडणूक लढणार आहेत. ममता बॅनर्जींनी 2021 मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ( Nandigram Assembly constituency) निवडणूक लढली होती. मात्र त्यावेळी भाजपच्या शुभेंदू अधिकारी (Mamata Banerjee vs Suvendu Adhikari) यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जींनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढून पुन्हा विधानसभेत एन्ट्री केली होती.  आता यावेळी त्यांनी नंदीग्रामऐवजी भवानीपूर मतदारसंघातूनच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर नंदीग्राममधून तृणमूलने पबित्रा कार्की यांना तिकीट दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पबित्रा कार्की Pabitra Karki यांनी नुकताच भाजपमधून तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे मागील 2021 च्या विधानसभा निवडणुकीत पबित्रा कार्की यांनी शुंभेंदू अधिकारी यांच्या विजयात मोलाची भूमिका निभावली होती. त्यांना 2021 मध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकऱणात अटकही झाली होती. आता ममता बॅनर्जींनी आपल्याच पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या उमेदवाराला, आपल्याच पक्षातून तिकीट देऊन पराभवाची परतफेड करण्याचा विडा उचलला आहे.

226 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा (West Bengal seats)

दरम्यान, ममता बॅनर्जींनी 291 जागा तृणमूल आणि 3 जागा मित्रपक्ष लढणार असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर यावेळी आम्ही विधानसभेच्या 226 पेक्षा जास्त जागा जिंकून बहुमताने सरकार स्थापन करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपवर तुफान हल्ला (Mamata Banerjee on BJP)

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उमेदवार जाहीर करताना, भाजपवर तुफान हल्ला चढवला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मला भाजपला विचारायचंय, तुम्ही इतके का घाबरलाय? सरकारी यंत्रणा, ईडी सीबीआयचा वापर करुन, बाहेरील लाखो लोकांना इकडे आणून आमच्याविरोधात भडकवलं जात आहे. तुम्ही राजकीय लढाई ही त्यापद्धतीनेच लढा"

याशिवाय ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोगावरही हल्लाबोल केला. निवडणूक अधिसूचना जारी होण्यापूर्वीच पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक किंवा अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. मात्र तुम्ही काहीही केलं तरी आम्ही भाजपला यंदा कोणतीही संधी देणारच नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.  

ही बंगालच्या अस्तित्वाची लढाई (Mamata Banerjee on Election)

दरम्यान, पश्चिम बंगाल निवडणूक ही केवळ विधानसभेची निवडणूक नाही तर बंगालची अस्मिता आणि अस्तित्वाची लढाई आहे, असं ममता बॅनर्जींनी सांगितलं.  ही बंगाली अस्मितेची लढाई आहे. ईदपूर्वी अधिकाऱ्यांची बदली करुन तुम्हाला दंगली घडवायच्या आहेत का? शांत असलेल्या बंगालमध्ये अशांतता निर्माण करण्याचा घाट भाजपने नेहमीच आखला आहे, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. 

त्या RSS नेत्यांचा आदर (Mamata Banerjee on RSS)

ममता बॅनर्जींनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या नेत्यांबद्दल आदर असल्याचं सांगितलं. मला संघाच्या जुन्या नेत्यांचा आदर आहे, मात्र आता जे कोणी नेते उरले आहेत, त्यांनी हरियाणातून लोक भरले आहेत, पोलिसांच्या बदलीचा निर्णय तेच घेतात, इतकंच नाही तर दंगली घडवण्यासाठी बाहेरुन हत्यारं आणण्याचं कामही तेच करतात, असा हल्लाबोल ममतांनी केला.  

संबंधित बातम्या 

मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

महत्त्वाच्या बातम्या

Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
Embed widget