एक्स्प्लोर

शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार

Delhi Shocking video: दिल्लीतील एका तरुणाचा रिल शूट करत असताना दुर्देवी मृत्यू झाला.

Man Dies While Shooting Reel with Gun: रिल्ससाठी कोण काय करेल, कोण कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. पूर्व दिल्लीतूनही असाच काहीसा प्रकार उघड झाला आहे. रिल्सच्या क्षुल्लक लाईक्स आणि कमेंट्ससाठी अनेक तरुण खटाटोप करताना दिसतात.  अशातच दिल्लीतील एका तरुणानेही व्हिडीओ तयार करत असताना आपल्या जीवाची बाजी लावली.  स्टंट करत असताना  एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण पिस्तूल हाताळत स्टंट करत असताना अचानक गोळी सुटली. गोळी थेट छातीत घुसली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.  या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन कुमार (वय वर्ष 28) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो दल्लूपुरा गावचा रहिवासी असल्याची माहिती आहे.  दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मार्च रोजी, न्यू अशोक नगर पोलीस ठाण्याला, वसुंधरा एन्क्लेव्ह येथील धर्मशिला रुग्णालयातून एका तरुणाला गोळी लागल्याची माहिती मिळाली होती.  माहिती मिळताच पोलिसांच्या टीमने थेट हॉस्पिटल गाठले. 

हॉस्पिटलमध्ये पवन कुमारला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरुणाच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागल्याची माहिती आहे. पवन कुमारला  रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला तपासले. तसेच मृत घोषित केले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे उघड झाले की, पवन कुमार हा चुलत भाऊ  हिमांशुच्या परवानाधारक पिस्तुलाने  स्टंट करत होता. तर, हिमांशु हा पवनचा व्हिडीओ शूट करत होता.  त्यानंतर पवनने पिस्तुलात मॅगझिन घालून, आपल्या छातीवर ठेवले. तसेच ट्रिगर दाबले. यामुळे बंदुकीतील गोळी थेट काळजात घुसली. यात त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच क्राइम टीम आणि फोरेंसिक टीमने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पोलिसांनी तपास करत परवानाधारक पिस्तूल जप्त केली. तसेच हिमांशुचा मोबाइलही जप्त केला.  व्हिडीओच्या प्राथमिक तपासातून हे स्पष्टपणे दिसून येते की, पवन स्वत:च  शस्त्र हाताळत होता. त्याचवेळी हा अपघात घडला आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून,  पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. सध्या अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेनंतर परिसरात तसेच इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

हाय गर्मी! हाय स्लिट ड्रेसवर प्रियांका चोप्राचा खास अंदाज; सिल्व्हर बॅकलेस ड्रेसवर दिसते कमाल, PHOTOs

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 20 August 2026: आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget