एक्स्प्लोर

Uttarakhand Glacier Collapse: उत्तराखंड सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जाहीर, घटनेशी संबंधित 10 मोठ्या गोष्टी

उत्तराखंडमधील जोशीमठ येथे हिमकडा तुटल्याने प्रचंड विनाश झाला आहे. ऋषीगंगा प्रकल्प वाहून गेल्याची बातमी आहे. त्याच वेळी तपोवन ऊर्जा प्रकल्पाला देखील फटका बसला आहे. दोन पुल तुटले असून दीडशे लोक बेपत्ता होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या जोशीमठमधील हिमकडा कोसळल्याने कहर निर्माण झाला आहे. दरम्यान, उत्तराखंड सरकारने हेल्प लाइन क्रमांक जाहीर केला आहे. अपघाताशी संबंधित माहितीसाठी आपण 1070 आणि 9557444486 वर कॉल करू शकता. देहरादून, हरिद्वार आणि ऋषिकेश येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोकांना सखल भागातून काढले जात आहे. एनडीआरएफच्या तीन पथकांना दिल्लीहून पाठविण्यात आले आहे. एनडीआरएफकडून झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे.

कोणत्याही प्रकारच्या अफवाकडे लक्ष देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

जनतेने कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी केले आहे. जुने व्हिडिओ शेअर करू नका. एबीपी न्यूजशी बोलताना उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी याबाबतचे ताजे अपडेट सांगितले. ते म्हणाले की हिमकडा तुटल्यानंतर पाण्याची हानिकारक पातळी नियंत्रणात आहे. रेणी उर्जा प्रकल्प पूर्णपणे कोसळला असून तिथं काम करणाऱ्या लोकांच्या वाचण्याची शक्यता कमी आहे. तपोवन या दुसर्‍या उर्जा प्रकल्पाचेही नुकसान झाले आहे. तिथेही मदत व बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, घटनेनंतर सखल भागातील लोकांना सतर्क करण्यात आले आहे.

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पाणी पातळी वाढल्याने अनेकजण वाहून गेल्याची भीती

या घटनेशी संबंधित 10 मोठ्या गोष्टी

  1. जोशीमठपासून 25 कि.मी. अंतरावर हिमकडा तुटला
  2. आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट, मृतदेह बाहेर काढण्यात आले
  3. पैंग गावाच्या वरील भागातही ग्लेशियर फुटत आहे.
  4. ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान
  5. तपोवन जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला
  6. पुरात 150 लोक वाहून गेल्याची भीती
  7. हरिद्वार आणि उत्तर प्रदेशच्या बिजनोरपर्यंत प्रशासनाचा इशारा
  8. NDRF ची तीन पथक उत्तराखंडला रवाना झाली आहेत
  9. पाणी रुद्रप्रयागपर्यंत पोहचले असून पाण्याचा प्रवाह कमी झालाय
  10. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली
उत्तराखंड हिमकडा कोसळून धरणाचा बांध फुटला, कुंभमेळ्याची तयारी करणाऱ्या हरिद्वारमध्ये अलर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Saudi Prince Salman : सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस
रामेश्वरम कॅफे स्फोट : संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला NIAकडून 10 लाखांचे बक्षीस
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 March 2024Kolhapur Loksabha Election 2024 : बंटी-मुन्ना कधी एकत्र येणार? जय-वीरुची  बुलेट राईड !!Prakash Ambedkar Sharad Pawar Sanjay Raut : मविआ आणि वंचित युतीच्या पुन्हा चर्चाSharad Pawar - Sanjay Raut : काँग्रेसची नाराजी; 'मैत्रीपूर्ण'साठी राजी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Saudi Prince Salman : सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस
रामेश्वरम कॅफे स्फोट : संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला NIAकडून 10 लाखांचे बक्षीस
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
MS Dhoni And Pathirana Video: गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
Embed widget