Divya-Ayodhya Tourism App : अयोध्येला भेट देणाऱ्यांचा प्रवास सोपा होणार; यूपी सरकारकडून Divya-Ayodhya Tourism App लाॅन्च
Divya Ayodhya Tourism App : हे मोबाईल अॅप ज्येष्ठ नागरिकांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. व्हीलचेअर आणि गोल्फ कार्ट बुक करण्याचा पर्यायही पर्यटन अॅपमध्ये उपलब्ध आहे.
Divya-Ayodhya Tourism App : अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून जय्यत तयारी सुरु आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी दिव्य-अयोध्या हे डिजिटल टुरिस्ट मोबाइल अॅप (Divya-Ayodhya tourism app) लाॅन्च केलं आहे. या मोबाईल अॅपमुळे पर्यटकांना मंदिर परिसरात नेव्हिगेट करणे सोपं होणार आहे. राममंदिराच्या अभिषेकासाठी काही दिवस शिल्लक असताना हे मोबाईल अॅप लॉन्च करण्यात आले आहे.
काय आहेत अॅपची वैशिष्ट्ये? (Features of the Divya-Ayodhya tourism app)
दिव्य अयोध्या टुरिझम मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये (Divya-Ayodhya tourism app) वाहन बुकिंग, ऑनलाइन पार्किंग बुकिंग आणि नेव्हिगेशनच्या सुविधा आहेत. तसेच अॅपमधून अयोध्या शहराचे वर्णन आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाची माहिती देईल. या मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करून हॉटेल, होमस्टे आणि अगदी टेंट सिटी देखील बुक करता येतात. हे नवीन अॅप पर्यटकांना स्थानिक प्रशिक्षित गाईडची सुद्धा माहिती देईल. हे मोबाईल अॅप ज्येष्ठ नागरिकांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. व्हीलचेअर आणि गोल्फ कार्ट बुक करण्याचा पर्यायही पर्यटन अॅपमध्ये उपलब्ध आहे.
पर्यटकांसाठी ५० इलेक्ट्रिक बसेस आणि 25 ग्रीन ऑटो
दरम्यान, काल रविवारी (14 जानेवारी) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या बसस्थानकावरून पर्यटकांसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस आणि 25 ग्रीन ऑटोंचे लोकार्पण केले. ई-बस नव्याने बांधण्यात आलेल्या धर्मपथ आणि राम पथांवर चालतील. अयोध्येतील चार प्रमुख मार्गांपैकी राम मार्ग आणि धर्मपथ हे दोन आहेत. इतर दोन मार्ग म्हणजे भक्ती पथ आणि जन्मभूमी पथ आहेत. आजपासून आणखी 100 ई-बसेस सुरु होणार आहेत. यामुळे केवळ पर्यटक आणि भाविकांना फायदा होणार नाही, तर मंदिर परिसरातील प्रदूषणही कमी होईल.
'प्राण प्रतिष्ठा' सोहळा मंगळवारपासून म्हणजे उद्या 16 जानेवारीपासून सात दिवस चालणार आहे. मंदिर ट्रस्टने नियुक्त केलेले यजमान श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र प्रायश्चित्त समारंभाचे आयोजन करतील, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. सरयू नदीच्या काठावर दशविध स्नान, विष्णूपूजा आणि गायींचा नैवेद्य होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या