एक्स्प्लोर
लॅम्बॉर्गिनीच्या धडकेत इको कार हवेत उडाली, थरार कॅमेऱ्यात कैद
नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाता झाला. लॅम्बॉर्गिनी कारने इकोला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये इको चालवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
लॅम्बॉर्गिनीची धडक एवढी जोरदार होती की धडकेनंतर इको कार हवेत उडाली. एका स्विफ्ट डिझायरने ओव्हरटेक करण्याच्या नादात अचानक लेन बदलली. त्यामुळे लॅम्बॉर्गिनी चालकाचा ताबा सुटला आणि त्याने बाजूच्या इकोला धडक दिली.
इको चालकाचं नाव अरशद अहमद असल्याचं बोललं जात आहे, जे पूर्वी दिल्लीतील मंडावली येथील रहिवासी आहेत. घटनेनंतर अरशद अहमद यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र यादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. लॅम्बॉर्गिनी चालक सध्या फरार आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement