एक्स्प्लोर
Advertisement
मोदींनी जनतेला कडक चहा नाही, कडू चहा पाजला आहे: अखिलेश यादव
लखनौ: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय अतिशय घाई-गडबडीत घेतला असल्याचं उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. कालच्या गाझीपूरच्या सभेतील मोदींच्या भाषणावर टिप्पणी करत अखिलेश म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींनी गरीबांना कडक नाही तर कडू चहा पाजला आहे.'
सरकारच्या निर्णयाची पोलखोल झाली आहे: अखिलेश यादव
अखिलेश म्हणाले की, 'जे सरकार जनतेला त्रास देतं, जनता त्या सरकारला हटवतं. मोदींनी गरीबांना अडचणीत टाकलं आहे. केंद्र सरकारनं कोणतीही तयार न करता हा निर्णय घेतला. त्यामुळे आता सरकारची पोलखोल झाली आहे. नोटाबंदीच्या या निर्णयानं लोक त्रस्त आहेत.'
अखिलेश म्हणाले की, 'संपूर्ण देशातील स्थिती सामान्य होण्यासाठी जवळजवळ 6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. एक मुख्यमंत्री म्हणून मला देखील आताच्या परिस्थितीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या बँका आणि एटीएमममध्ये पुरेसे पैसे नाहीत. अशावेळी अजून कुठवर सामान्य माणूस त्रास सहन करणार?' संबंधित बातम्या:Jo sarkaarein janata ko dukh deti hain, janata uss sarkaar ko hata deti hai: UP CM Akhilesh Yadav on Govt's demonetisation decision pic.twitter.com/fRtNuf1iAK
— ANI UP (@ANINewsUP) November 15, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement