Cancer Vaccine : गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिली स्वदेशी लस; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडून लोकार्पण
India's First Cervical Cancer Vaccine : गर्भाशयाच्या कर्करोग या घातक आजारावर मात करणारी प्रभावी लस भारतातच तयार झाली आहे.
India's First Cervical Cancer Vaccine : गर्भाशयाच्या कर्करोग या घातक आजारावर मात करणारी प्रभावी लस भारतातच तयार झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगावरील पहिल्या स्वदेशी लस तयार केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी कर्करोगावरील लस लाँच केली. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटनं 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' ही स्वदेशी लस विकसित केली.
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला गर्भाशयाच्या कर्करोगावरील प्रभावी लस (Vaccine) तयार करण्यास परवानगी दिली होती. सीरम इन्स्टिट्यूटच्या qHPV लसीला DCGI कडून 12 जुलै रोजी मार्केट ऑशरायझेशन मिळाले होते. आज केंद्रीय आरोग्य मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते या लसीचं आनावरण झालं. कॅन्सर या आजारावरील लस भारत सध्या परदेशातून आयात करतो. त्यामुळे त्यासाठी जास्त खर्च येतो. आता ही लस देशातच उपलब्ध झाल्यामुळे लसीवरील खर्च कमी होऊन रुग्णांना अगदी सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
Historic milestone in Preventive Healthcare,under leadership of PM Sh @NarendraModi.
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) September 1, 2022
India’s first indigenously developed Quadrivalent Human Papillomavirus vaccine (qHPV) against Cervical Cancer launched by Department of Biotechnology under Union Ministry of Science & Technology pic.twitter.com/EItvwgVX9J
गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीची किंमत 200 ते 400 रुपये?
या लसीची किंमत किती असणार याबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे. मात्र, याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief executive officer) अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी माहिती दिली आहे. गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीची किंमत ही 200 ते 400 रुपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र, अद्याप किंमत निश्चित केली नसल्याची माहिती पुनावाला यांनी दिली आहे. ही लस प्रथम आपल्या देशाला देण्यात येणार आहे. त्यानंतर जगातील इतर देशांना देण्यात येणार असल्याची माहिती देखील अदर पुनावाला यांनी दिली. 2 वर्षांत 200 दशलक्ष डोस तयार करण्याची तयारी असल्याचेही पुनावाला यांनी म्हटले आहे.
काय आहे सर्वाइकल कॅन्सर?
Cervical cancer हा कर्करोगाचा एक प्रकार आहे. जो गर्भाशयाच्या ग्रीवाच्या पेशींमध्ये होतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) म्हणजे, लैंगिक संक्रमित संसर्ग आहे. हा विषाणू गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरतो. या कर्करोगावरील प्रभावी लस वय वर्ष नऊ ते 14 वयोगटातील मुलींना दिली जाऊ शकते, असं सांगितलं जात आहे.
लस गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रभावी
भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) प्रमाण वाढले आहे. एका अहवालानुसार, 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश केल्यास महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाची समस्या कमी करण्याच्या दिशेनं एक ठोस पाऊल ठरू शकतं.