एक्स्प्लोर

UIDAI New Circular: मुदत वाढवली... आधार अपडेट करण्यासाठी आता 14 डिसेंबरपर्यंतची मुदत अन् पूर्णपणे मोफत

Aadhaar Card Free Update : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI नं मार्च महिन्यापासून ते ऑनलाईन मोफत अपडेट करण्याची सुविधा दिली आहे आणि आता तुम्ही हे काम 14 डिसेंबर 2023 पर्यंत अगदी मोफत करू शकता.

UIDAI New Circular: आधार कार्डधारकांना मोठा दिलासा देत, यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आता ते मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. आधार कार्ड (Aadhaar Card)  अपडेट करण्यासाठी सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली जात आहे. यापूर्वी, आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख 14 जून 2023 निश्चित करण्यात आली होती, परंतु  ती 14 सप्टेंबरपर्यंत तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा UIDAI नं ही सुविधा 14 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

15 मार्चपासून मोफत अपडेट सुविधा सुरू

आजच्या काळात आधार कार्ड  (Aadhaar Card) हे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक बनलं आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणं असो वा, बँकेत खातं उघडायचं असो सगळीकडे आधार कार्डाची गरज भासते. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दरम्यान, हे काम करण्यासाठी शुल्क आहे, पण  UIDAI ने मार्चच्या शेवटच्या महिन्यात ते विनामूल्य ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे आता तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत तुमचं आधार कार्ड विनामूल्य अपडेट करु शकणार आहात. 

माय आधार पोर्टलद्वारे अपडेट मिळवा

UIDAI नं अधिसूचना जाहीर करत म्हटलं आहे की, सरकार अधिकाधिक लोकांना त्यांची आधार कागदपत्रे अपडेट करण्यासाठी अतिरिक्त तीन महिन्यांची मुदत देत आहे आणि हे काम आता 14 डिसेंबरपर्यंत My Aadhaar पोर्टलद्वारे विनामूल्य अपडेट केलं जाऊ शकतं. महत्त्वाची बाब म्हणजे, UIDAI नं आधार कार्ड धारकाला नावनोंदणीच्या तारखेपासून 10 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यात दिलेली कागदपत्रं पुन्हा एकदा अपडेट करण्यास सांगितलं आहे. हे काम घरात बसूनही अगदी सहज पूर्ण करता येणार आहे. 

माय आधार पोर्टलमार्फत कसं कराल अपडेट? 

  • https://myaadhaar.uidai.gov.in/ पर लॉगइन कराल. 
  • लॉगइन केल्यानंतर 'नाव/लिंग/जन्मतारीख आणि पत्ता अपडेट' ऑप्शनवर क्लिक करा. 
  • जर आधार कार्डावरील पत्ता अपडेट करायचा असेल, तर Update Address पर्याय निवडा. 
  • त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी टाकून पुढा जा. 
  • डॉक्युमेंट अपडेटचा पर्याय निवडा. आता तुम्हाला तुमच्यासमोर तुमचे आधार डिटेल्स दिसतील. 
  • स्क्रिनवर दिसणारे डिटेल्स चेक करुन व्हेरिफाय करा आणि पुढे जा. 
  • त्यानंतर तुम्हाला अॅड्रेस प्रूफसाठी अॅड्रेस प्रूफची कॉपी अपलोड करा. 
  • आता आधार अपडेट झाल्यानंतर 14 नंबर्स असलेला अपडेट रिक्वेस्ट नंबर  (URN) जनरेट होईल. 
  • या नंबर मार्फत तुम्ही तुमच्या आधारमध्ये केलेले बदल ट्रॅक करु शकता. 

'या' कामासाठी द्यावं लागेल शुल्क 

आत्तापर्यंत, आधार कार्डधारकाला (Aadhaar Card Holder) त्यांच्या आधार कार्डमध्ये कोणत्याही प्रकारचे अपडेट करण्यासाठी 25 रुपये ऑनलाईन आणि 50 रुपये ऑफलाईन शुल्क भरावं लागत होतं. म्हणजेच, कागदपत्र अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर गेल्यास 50 रुपये आकारले जात होते. जर हे काम myAadhaar पोर्टल द्वारे केलं गेलं असेल तर 25 रुपये फी भरावी लागणार होती. परंतु, 15 मार्च 2023 पासून ऑनलाईन आधार अपडेटची सुविधा पूर्णपणे मोफत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Embed widget