एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी UAN गरजेचं!
मुंबई: 'यूनिव्हर्सल अकाउंट नंबर' (UAN) धारकांसाठी पीएफ ट्रान्सफरची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. यूएएनमुळे पीएफ ट्रान्सफर आणि पीएफ खात्याताली रक्कम काढून घेणं आता अधिक सोपं झालं आहे.
बऱ्याच कर्मचाऱ्यांना एकाहून अधिक यूएएन ही दिले जातात. बऱ्याचदा कर्मचारी एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जातो त्यावेळी त्याच्याकडे आधीच्या कंपनीचा यूएएन असतो. त्यामुळे त्याच यूएएनवर नव्या कंपनीचं पीएफ खातं जोडता येतं.
एकाहून अधिक यूएएन
यूएएनवर तुमच्या दोन्ही पीएफ अकाउंटची माहिती उपलब्ध होते. अनेकदा कर्मचाऱ्यांना एकाहून अधिक यूएएन दिले जातात. कारण की, बऱ्याचदा तुमची माहिती अपडेट झालेली नसते. अशावेळी तुमच्या कंपनीनं ईपीएफओला तुम्ही कंपनी सोडत असल्याचं कळवणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचा दुसरा यूएएन क्रमांक तयार होणार नाही.
एकाहून अधिक यूएएन असल्यास काय कराल?
जर तुम्हाला एकाहून अधिक यूएएन मिळाला असेल तर सर्वात आधी तुम्ही जिथे काम करीत आहात. तिथं याबाबत माहिती द्या. तसंच तुम्ही ईपीएओला uanepf@epfindia.gov.in मेल पाठवू शकतात. ज्यामध्ये तुम्ही तुमचे दोन्ही UNA लिहणं गरजेचं आहे. त्यानंतर या दोन्ही क्रमांकाची पडताळणी केली जाऊन तुमचा पहिला यूएएन ब्लॉक केला जाईल आणि सध्या सुरु असलेला यूएएन चालू ठेवण्यात येईल. त्यानंतर तुम्ही तुमचा जुन्या यूएएनवरील पीएफ नव्या यूएएनवर ट्रान्सफर करु शकता. यूएएन अॅक्टिव्हेट झालेल्या खातेदारांसाठी ईपीएफओने 'फॉर्म 11' दिला आहे.
एकाहून अधिक यूएएन टाळा
जेव्हा तुम्ही दुसऱ्या कंपनीत जाता त्यावेळी सगळ्यात आधी 'फॉर्म 11'ची मागणी करा. ज्यामुळे तुमचा आहे तोच यूएएन कायम राहतो.
यामुळे तुमच्या नव्या कंपनीतील पीएफ खातं तुमच्या यूएएनशी जोडलं जाईल. पण त्याआधी तुमचं यूएएन अॅक्टिव्ह झालं आहे याची खात्री करुन घ्या. या http://uanmembers.epfoservices.in/ लिंकवर जाऊन तुम्ही यूएएन अॅक्टिव्ह करु शकता. यामध्ये यूएएन नंबर, मोबाइल नंबर आणि इतर विचारलेली माहिती भरावी. त्यानंतर तुम्हाला एक पिन कोड मिळेल तो भरुन सबमिट करावा. यानंतर पुढील माहिती विचारली जाईल. ती भरावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement