एक्स्प्लोर
गोव्याच्या समुद्रात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू
सेल्फी घेत असताना एका जोरदार लाटेच्या तडाख्याने तिघेही समुद्रात फेकले गेले. त्यातील दोघे धडपड करून समुद्रा बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र एकजण समुद्रात वाहून गेला.
![गोव्याच्या समुद्रात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू two tourist died in goa sea गोव्याच्या समुद्रात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/17232115/goa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधिक फोटो
गोवा : बागा आणि सीकेरी येथे समुद्रात बुड़ुन दोन देशी पर्यटकांचा मृत्यू झाला. दोन्ही पर्यटक तामीळनाडु येथील आहेत. धोक्याचा इशारा दिलेला असताना देखील पर्यटक समुद्रात उतरत असल्याने दुर्घटना वाढू लागल्या आहेत.गेल्या आठवडयात महाराष्ट्रातील 5 पर्यटकांचा कळंगुट समुद्रात बुड़ुन मृत्यू झाला होता.
कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मेंगलोर आणि तामीळनाडू येथील 8 पर्यटकांचा गट सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमरास बागा येथील किनाऱ्यावर आले होते. या गटातील तिघे बागा किनाऱ्याच्या टोकास जाऊन जवळच्या खडकाळ भागात गेले होते. तेथे उभे राहून सेल्फी घेत असताना एका जोरदार लाटेच्या तडाख्याने तिघेही समुद्रात फेकले गेले. त्यातील दोघे धडपड करून समुद्रा बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र एकजण समुद्रात वाहून गेला. काही वेळाने त्याचा मृतदेह वाहून किनाऱ्यावर आला. मृताचे नाव दिनेश कुमार रंगनाथन असून हा 28 वर्षीय तरुण तामिळनाडू येथील होता. पोलिसांनी दिनेशचा मृतदेह गोमेकॉच्या शवागृहात पाठवून पुढील तपास सुरु आहे.
समुद्रात बुड़ुन मृत्यूमुखी पडण्याची दुसरी घटना आज सकाळी साडे सात वाजता सीकेरी समुद्रात घडली.
तामीळनाडू येथील 4 पर्यटक सूर्योदय पाहण्यासाठी आग्वाद किल्ल्या खालील सीकेरी येथील खडकाळ भागात गेले होते.चौघांपैकी तिघे खडकावर बसले होते तर चौथा त्यांचे फोटो काढत होता.फोटो काढ़णे सुरु असताना आलेल्या एका जोरदार लाटेमध्ये एक तरुण वाहून गेला.या घटनेमध्ये बुड़ुन मृत्यूमुखी पडलेल्या पडलेल्या 33 वर्षीय तरुणाचे नाव शशीकुमार वासन असून तो तामिळनाडू येथील होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)