एक्स्प्लोर
Advertisement
त्रिवेंद्र सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री
देहरादून : उत्तराखंडमध्ये भाजप आमदारांनी त्रिवेंद्र सिंह रावत यांची गटनेते पदी निवड केली आहे. उद्या दुपारी (शनिवार) त्रिवेंद्र सिंह उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. देहरादूनमध्ये या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
त्रिवेंद्र सिंह यांच्या नावाला भाजप आमदारांनी पाठिंबा दर्शवला. त्यामुळे ते आता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्रिवेंद्र सिंह यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचा नेता मानलं जात. शिवाय ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे निकटवर्तीय समजले जातात.
लोकसभा निवडणुकीदरम्यान त्रिवेंद्र सिंह यांनी अमित शाहांसोबत काम केलं होतं. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या विजयातही त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांनी उत्तराखंडमधील डोईवाला मतदार संघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हीरा सिंह बिष्ट यांचा पराभव केला आहे.
त्रिवेद्र सिंह यांच्या शपथविधी सोहळ्याला अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
उत्तराखंड विधानसभेच्या 70 जागांपैकी भाजपने 57 जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर सत्ताधारी काँग्रेसला केवळ 11 जागांवर रोखण्यात भाजपला यश मिळालं. उत्तराखंडला 2000 साली उत्तर प्रदेशमधून विभाजन करत स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement