एक्स्प्लोर

Pune Bhide Wada : भिडे वाड्याचा मार्ग मोकळा, एका महिन्यात भिडेवाडा रिकामा करून महापालिकेकडे हस्तांतरित करा; कोर्टाचा आदेश

Bhidewada Latest Update : महिन्याभरात वाडा रिकामा करून पुणे महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

पुणे : भारतातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडे वाड्याचे (bhide wada) राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भिडे वाड्याचा ताबा पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याला फटकरतानाच महिन्याभरात वाडा रिकामा करून पुणे महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला. या प्रकरणात तेरा वर्ष न्यायालयीन संघर्ष करावा लागला यावरही नाराजी व्यक्त करून याचिका करताना तुम्हाला दंड का करू नये, असा प्रश्न सुनावणीच्या वेळी न्यायालयाने केला. 

भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा

महापालिकेकडे ताबा दिला नाही तर, पालिका जबरदस्तीने वाड्याचे भूसंपादन करेल, असेही न्यायालयाने याचिका करताना खडसावले. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा शहरातील बुधवार पेठ येथील तात्याराव भिडे वाड्यामध्ये सुरू केली होती. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे काम 2006 पासून रखडले आहे. भिडे वाड्याची मालकी एका सहकारी बँकेकडे आली होती. या बँकेच्या चोवीस भाडेकरूंनी या प्रकरणी पालिकेविरोधात खटला दाखल केला होता. उच्च न्यायालयात 80 वेळा सुनावणी होऊन पुणे महापालिकेच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला. 

भिडेवाडा पालिकेकडे हस्तांतरित करा, कोर्टाचा आदेश

या निकाला विरोधात भाडेकरूनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या वाड्याबाबत पालिकेने सर्वोच्च न्यायालयात अगोदरच कॅव्हेट दाखल केली आहे. या संदर्भात गुरुवारी सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने भिडे वाडा संदर्भातील याचिका फेटाळली. 13  वर्षे या स्मारकासाठी न्यायालयीन संघर्ष करावा लागला, याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करून याचिका करतांना तुम्हाला दंड का करू नये, असा प्रश्न केला. एका महिन्यात भिडेवाडा रिकामा करून महापालिकेकडे हस्तांतरित करा, असा आदेश दिला. तसेच असे न केल्यास महापालिका जबरदस्तीने भूसंपादन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

देशातील पहिली मुलींची शाळा

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या भिडेवाड्याचे आता राष्ट्रीय स्मारक होण्याचा शेवटचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा भिडे वाड्यात विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा सुरु होणार आहे. या वाड्यात पुन्हा शाळा सुरु व्हावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या -

Maratha Reservation : जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget