एक्स्प्लोर

Gunaratna Sadavarte : प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, सुरेश धसांचा निषेध, बीडमधील मोर्चाचा 'शिमगा' म्हणून उल्लेख, गुणरत्न सदावर्ते कडाडले

Prajakta Mali vs Suresh Dhas Controversy : अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यातील वादावर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केलंय.

Gunaratna Sadavarte : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. सुरेश धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करत अनेक अभिनेत्रींचीही नाव घेतली. यात अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) नावाचाही समावेश आहे. आता यावरून अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर शनिवारी संतोष देशमुख यांची हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मूक मोर्चावरही त्यांनी टीका केली आहे. 

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आमदार म्हणून शपथ घेतलेले सुरेश धस यांचा जाहीर निषेध. महाराष्ट्रात कलावंतांना अशा प्रकारे अपमानित करण्याचे धारिष्ट धसमध्ये कसे आले? विधानसभेच्या सभापतींनी सुरेश धस यांच्या विरोधात कारवाई करावी.  ⁠प्राजक्ता माळी यांना माझा पाठिंबा आहे. ⁠प्राजक्ता माळी, राश्मिका मंदाना, सपना चौधरी या सर्वांना माझा पाठिंबा आहे. कलावंतांना कोणी अपमानित करत असेल तर त्या लोकांना विरोध करणे, हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. आम्ही कलावंतांसोबत आहोत, असे त्यांनी म्हटले. 

बीडमधील मोर्चा वाटला नाही, तो शिमगा

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा आयोजित करण्यात आला. यावरूनही गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार हल्लबोल केलाय. ते म्हणाले की, कालचा धस, जरांगे आणि आव्हाड यांचा मोर्चा स्वतःच्या स्वार्थासाठी होता. कोणालाही न्याय मिळण्यासाठी तो मोर्चा नव्हता. मला तो मोर्चा वाटला नाही, तो शिमगा वाटत होता. मोर्चात शिट्ट्या आणि टाळ्या वाजवण्यात आल्या, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. तर एखादी आदरांजली सभा असेल तर अशा प्रकारच्या वर्तन असू शकते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

चंद्रकांत पाटलांनी सुरेश धसांना सुनावले खडेबोल

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील सुरेश धस यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटलंय की, या प्रकरणात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही. सुरेश धस यांना आज मी फोन करणार आहे. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनी देखील काल प्रेस घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार आहे. पार्टीचा आमदार असून देखील तुम्ही असं काम करत आहे. तुम्ही असं करू नये, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HSC Exam : परीक्षा एकाची अन् इंग्रजीच्या पेपरला बसवले दुसऱ्यालाच, एका चुकीनं बिंग फुटलं, तोतया परीक्षार्थीवर गुन्हा दाखल
बारावीच्या परीक्षेत हेराफेरी, इंग्रजीच्या पेपरला तोतया परीक्षार्थी बसला, एका चुकीनं बिंग फुटलं अन्... 
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
Jasprit Bumrah : मोठी बातमी, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर,टीम इंडियाला धक्का, बीसीसीआयनं कुणाला दिली संधी?
जसप्रीत बुमराह टीम इंडियातून बाहेर, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा धक्का, रोहित शर्मा कुणाला संधी देणार?   
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025Rinku Rajguru Kolhapur | कोल्हापुरात आर्ची आली, फोटोमुळं चर्चा झाली! Special ReportTanaji Sawant Son Kidnapping| कहाणी नेत्याच्या लेकाच्या अधुऱ्या बँकॉक वारीची ABP MajhaBharat Gogawle on Palakmantripad : पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात धुसफूस सुरूच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSC Exam : परीक्षा एकाची अन् इंग्रजीच्या पेपरला बसवले दुसऱ्यालाच, एका चुकीनं बिंग फुटलं, तोतया परीक्षार्थीवर गुन्हा दाखल
बारावीच्या परीक्षेत हेराफेरी, इंग्रजीच्या पेपरला तोतया परीक्षार्थी बसला, एका चुकीनं बिंग फुटलं अन्... 
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
Jasprit Bumrah : मोठी बातमी, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर,टीम इंडियाला धक्का, बीसीसीआयनं कुणाला दिली संधी?
जसप्रीत बुमराह टीम इंडियातून बाहेर, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा धक्का, रोहित शर्मा कुणाला संधी देणार?   
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
Embed widget