ABP Majha Headlines : 02 PM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अंजली दमानियांना बीडच्या पोलिसांची नोटीस, संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या तीन आरोपींची हत्या झाल्याच्या दाव्याचे पुरावे द्या अशी नोटीस..
बीड हत्याप्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा,, मुख्यमंत्र्यांचे आदेश... तर वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का दमानियांचा सवाल
कलाकार हा कलाकार असतो. त्याचं नाव कुणासोबत जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं.गौतमी पाटीलसह भाजप नेत्यांचाही प्राजक्ता माळीला पाठिंबा, ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नको गौतमीचा सल्ला.
नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिलं कमर्शियल फ्लाइट उतरणार, इंडिगोचं कमर्शियल फ्लाइट थोड्याच वेळात होणार लँड..
क्रीडा उपसंचालक आणि बँक अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुनच २१ कोटींचा घोटाळा केला, आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याचं पोलिसांना पत्र, हर्षकुमारच्या गर्लफ्रेंडला नवी मुंबईतून अटक...
निवडणुकीनंतरच्या दोन महिन्यांत लाडक्या बहिणींच्या संख्येत २६ लाखांनी वाढ, पण दीड हजारऐवजी २१०० रुपयांचा हप्ता मार्चनंतरच मिळण्याची शक्यता
मुस्लिमांनी काशी आणि मथुरेवरचा दावाही सोडावा, विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन सल्ला, दावा सोडल्यास इतर ठिकाणी वाद घालणार नाही अशी हमी..