जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
Beed: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या भाषणाविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करत कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे .
Beed: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय मूक मोर्चानंतर मोठा गदारोळ उडालाय. शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या व्हायरल चॅट प्रकरणाने खळबळ उडाली असून धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाडांवर ॲट्रॉसिटी दाखल करा अशी मागणी मुंडे समर्थक करतायत .दलित बांधवांसह धनंजय मुंडे यांचा खास माणूस पोलीस ठाण्यात दाखल झाला असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या भाषणाविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करत कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे . त्याबरोबरच दलित समाज बांधवांबाबत जितेंद्र आव्हाड यांचे जे कथित व्हाट्सअप चॅट व्हायरल झाले ,त्यावरही अक्षय पण नोंदवत आव्हाडांवर ॲट्रॉसिटी दाखल करेपर्यंत इथून जाणार नसल्याचं मुंडे कार्यकर्त्याने माध्यमांना सांगितलं .
शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय मोर्चात मंत्री धनंजय मुंडे यांच्या हकालपट्टीची मागणी करत पालकमंत्रीपदही त्यांना देऊ नये अशी एकमुखाने मागणी केल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे .
धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आव्हाडांविरोधात आक्रमक
राज्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याविरोधात बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला कोणाचाही विरोध नव्हता. धनंजय मुंडे आणि इतर सर्वांना असं सांगायचं होतं की ही हत्या कोणत्याही जातीय कारणातून झाली नाही. हत्येचं कारण वेगळं होतं. त्यामुळे त्याला जातीयवादाचं स्वरूप देऊ नका . असं सांगितलंनंतरही जितेंद्र आव्हाड मूक मोर्चात आले . त्यांनी भाषणात ज्याप्रकारे उच्चार केला . तसेच त्यांच्या व्हायरल झालेल्या चॅटमध्ये दलित, मुस्लिम या लोकांना बोलवून घ्या..पैशांची काळजी करू नका. जे पैसे लागतील ते मी देतो अशी भाषा त्यात होती .पहिला भाषणातही त्याचा मसाला गोळा कर मी दाखवतो एकेरी भाषेत धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला . याचा तीव्र जाहीर निषेध करून आव्हाडांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा , यासाठी आम्ही ॲडिशनल पोलीस अधीक्षकांना भेटलो .आज इथे येऊन आम्ही गुन्हा दाखल केलाय . आव्हाडांवर ॲट्रॉसिटी दाखल केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही .यासाठी निवेदन देण्यात आलंय .चौकशी झाल्यानंतर ठरवू असं अधिकारी सांगतात पण तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही .असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतलाय.
हेही वाचा: