एक्स्प्लोर

सरकारच्या योजना कामगारविरोधी, विविध संघटनांचा देशव्यापी बंद

रेल्वे, बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, कोळसा उद्योग, तेल आणि वायू, स्टील, पब्लिक सेक्टर कारखाने, वाहतूक उद्योग, बेस्ट, एसटी, टॅक्सी-रिक्षा म्युनिसिपल कामगार, फेरीवाले, माथाडी कामगार आणि कॉंट्रॅक्ट आणि आऊटसोर्स्ड कामगार, अंगणवाडी महिला, आशा कामगार, शिक्षक, प्राध्यापक, ग्रामपंचायत कर्मचारी, ईएसआय नर्स, नगरपालिका कामगार, अशा व्यापक जनसमूहांच्या प्रतिनिधींनी संप पुकारला आहे.

नवी दिल्ली : देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सुमारे 25 कोटी कामगारांनी एकजूट करुन दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. सरकारच्या योजना कामगारविरोधी असल्याचा आरोप करत या संघटनांनी आज-उद्या (8 आणि 9 जानेवारी) संपाची हाक देण्यात आली आहे. यामध्ये बँक, मुंबईतील बेस्ट बस, अंगणवाडी सेविका यांचा प्रामुख्याने सहभाग आहे. देशव्यापी संपाचा निर्णय देशातील 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि विविध उद्योगातील देशपातळीवरील स्वतंत्र संघटनांनी राजधानी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त परिषदेत घेतला. या परिषदेत INTUC, AITUC, CITU, HMS, AICCTU, IPF, SEWA, TUCI, AIUTUC, NTUI या संघटनांचा सहभाग आहे. कोणाकोणाचा समावेश? रेल्वे, बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, कोळसा उद्योग, तेल आणि वायू, स्टील, पब्लिक सेक्टर कारखाने, वाहतूक उद्योग, बेस्ट, एसटी, टॅक्सी-रिक्षा म्युनिसिपल कामगार, फेरीवाले, माथाडी कामगार आणि कॉंट्रॅक्ट आणि आऊटसोर्स्ड कामगार, अंगणवाडी महिला, आशा कामगार, शिक्षक, प्राध्यापक, ग्रामपंचायत कर्मचारी, ईएसआय नर्स, नगरपालिका कामगार, अशा व्यापक जनसमूहांच्या प्रतिनिधींनी संप पुकारला आहे. संपाच्या मागण्या काय? 1) शेतमजूरांसह सर्व कामगारांना 18 हजार रुपये किमान वेतन मिळालेच पाहिजे. 2) वाढती महागाई त्वरित रोखा आणि रेशन व्यवस्था बळकट करा. 3) रोजगार निर्मिती कॉंट्रॅक्ट सिस्टमने बंद करा आणि समान कामाला समान वेतन द्या, कॉंट्रॅक्टवरील कामगारांना कायम करा 4) बेराेजगारी राेखा, राेजगार वाढवा 5) कामगार कायदे न पाळणाऱ्या मालकांवर कारवाई करा. भांडवलदार आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या हुकूमानुसार कामगार कायदेबदल करणे थांबवा 6) सर्व कामगार शेतकरी जनतेला किमान तीन हजार रुपये पेन्शन मिळालेच पाहिजे 7) बाेनस, पीएफ (भविष्य निर्वाह निधी), ग्रॅच्युईटी कायद्यावरील सीलींग रद्द करा आणि ग्रॅच्युईटी रक्कम वाढवा 8) पब्लिक सेक्टर कंपन्यांचे खाजगीकरण थांबवा,अर्थव्यवस्था कमकुवत करु नका 9) रेल्वे, संरक्षण, पोर्ट ट्रस्ट, बँक आणि विमा व्यवसायाचे खाजगीकरण आणि या क्षेत्रात परकीय थेट गुंतवणूक (FDI) बंद करा. 10) कामगार कायदा बदलातून कामगार हक्क हिरावणे बंद करा 11) रजिस्ट्रार ऑफ ट्रेड युनियनकडे युनियन नाेंदणी 45 दिवसांत झालीच पाहिजे. ILO च्या 87 आणि 98 रेक्टिफिकेशनला मान्यता का देत नाहीत ? 12) सर्व नागरिकांना सामाजिक सुरक्षा मिळालीच पाहिजे. देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ दीड टक्का तरतूद अपुरी आहेच. आपण तिसरी माेठी अर्थव्यवस्था आहोत तर सामाजिक सुरक्षा अंतर्गत शिक्षण, आरोग्य, रेशन, पेन्शन यावर तरतूद 12 टक्के नकाे का?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget