एक्स्प्लोर
Advertisement
बँक फसवणुकीत ICICI बँक अव्वल, तर SBI बँक दुसऱ्या क्रमांकावर
नवी दिल्ली : गेल्या वर्षातील एप्रिल- डिसेंबर 2016 या नऊ महिन्यात बँकेच्या फसवणुकीच्या यादीत आयसीआयसीआय बँक अव्वल स्थानी असून, दुसऱ्या क्रमांकावर एसबीआय बँकेचा क्रमांक आहे. रिझर्व बँकेने याबाबतची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
गेल्या वर्षातील एप्रिल-डिसेंबर या नऊ महिन्यांमध्ये आयसीआयसीआय बँकेमध्ये 1 लाख रुपयाहून अधिकच्या रकमेसंदर्भातील 455 फसवणुकीची प्रकरणे आयसीआयसीआय बँकेत घडल्याचं समोर आलं. तर एसबीआय बँकेत हाच आकडा 429 इतका होता. याशिवाय स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेत 244, एचडीएफसी बँकेत 237 प्रकरणे समोर आली. तर अॅक्सिस बँकेत 189, बँक ऑफ बडोदामध्ये 176 आणि सिटी बँकेत 150 फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत.
या बँक फसवणुकीच्या प्रकरणात सर्वात मोठी फसवणूक ही एसबीआय बँकेत झाल्याचं समोर आलं आहे. एसबीआय बँकेत तब्बल 2,236. 81 कोटीची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. तर पंजाब नॅशनल बँकेत 2250.34 कोटी रुपये, अॅक्सिस बँकेत 1,998.49 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं.
या प्रकरणी रिझर्व बँकेने अर्थ मंत्रालयाकडे जी आकडेवारी सादर केली आहे, त्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं म्हणलं आहे. फसवणुकीच्या घटनांमध्ये सर्वाधिक एसबीआय बँकेचे 64 कर्मचारी आहेत, तर एचडीएफसी बँकेचे 49 आणि अॅक्सिस बँकेचे 35 कर्मचारी सहभागी असल्याचं म्हणलं आहे.
याशिवाय एप्रिल-डिसेंबर 2016 दरम्यान सरकारी आणि खासगी बँकांमधून तब्बल 450 बँक कर्मचारी असल्याचं समोर आलं आहे. या काळात तब्बल 17,750.27 कोटी रुपयांची एकूण 3870 प्रकरणे नोंदवण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement