एक्स्प्लोर
तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी, काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन
या तीनही राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. 2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेस मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे. तीनही राज्यातील शपथविधी कार्यक्रमाला सर्वांना उपस्थित राहता येईल अशाप्रकारे वेळेचं नियोजन करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या तीनही राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. 2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेस मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे. तीनही राज्यातील शपथविधी कार्यक्रमाला सर्वांना उपस्थित राहता येईल अशाप्रकारे वेळेचं नियोजन करण्यात आलं आहे.
या शपथविधी सोहळ्यात विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र महाआघाडीतील उत्तर प्रदेशचे दोन दिग्गज नेते मायावती आणि अखिलेश यादव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. तसेच आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल ही या कार्यक्रमाला येणार नाहीत. त्यामुळे महाआघाडीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री तर सचिन पायलट उपमुख्यमंत्री
तीनही राज्यात सर्वप्रथम राजस्थानमध्ये शपथ ग्रहण सोहळा पार पडेल. राजस्थानमध्ये आज अशोक गहलोत मुख्यमंत्री पदाची तर सचिन पायलट उपमुख्यमंत्री पादाची शपथ घेतील. सकाळी 10.30 वाजता अल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रमाला सुरुवात होईल. राज्यपाल कल्याण सिंह अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे दोघेच आज शपथ घेतील.
मध्य प्रदेशात कमलनाथ
मध्य प्रदेशात 15 वर्षाच्या वनवासानंतर काँग्रेस शपथविधी कार्यक्रम भव्य करण्याच्या तयारीत आहे. भोपाळच्या जंबुरी मैदानावर दुपारी 1.30 वाजता कमलनाथ मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. कमलनाथ एकटेच शपथ घेतील. इतर मंत्रीमंडळाचा काही दिवसानंतर शपथ ग्रहण सोहळा होईल. काँग्रेसला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याची आणि येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर शक्तीप्रदर्शन करण्याची मोठी संधी आहे.
छत्तीसगडची कमान भूपेश बघेल यांच्याकडे
छत्तीसगडमध्ये आज सांयकाळी 4.30 वाजता शपथविधी कार्यक्रम होईल. छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मोठ्या घडामोडीनंतर भूपेश बघेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह महाआघाडीतील नेते उपस्थित राहणार आहेत.
यांची असणार उपस्थिती
या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, चंद्राबाबू नायडू, दिनेश त्रिवेदी, एच.डी देवगौडा, फारुक अब्दु्ल्ला, तेजस्वी यादव, उपेंद्र कुशवाहा, मल्लिकार्जुन खर्गे, नवज्योत सिंह सिद्धू, भूपेंद्र हुड्डांसह विरोधी पक्षातील दिग्गज नेते उपस्थित राहतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement