एक्स्प्लोर
काँग्रेसचे महाअधिवेशन : समारोपाच्या भाषणात राहुल गांधी काय बोलणार?
डिसेंबर महिन्यात राहुल गांधींनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतले. त्यानंतर काँग्रेसचे हे पहिलेच महाअधिवेशन आहे. त्यामुळे राहुल गांधी काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या महाअधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज संध्याकाळी चार वाजता समारोपाचं भाषण करतील. अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांचं महाअधिवेशनातील हे पहिलेच भाषण असणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशवासियांचं या भाषणाकडे लक्ष लागले आहे.
दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये काँग्रेसच्या महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून प्रमुख नेत्यांसह 15 हजारांहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी दिल्लीत या महाअधिवेशनासाठी उपस्थित आहेत.
डिसेंबर महिन्यात राहुल गांधींनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतले. त्यानंतर काँग्रेसचे हे पहिलेच महाअधिवेशन आहे. त्यामुळे राहुल गांधी काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
काँग्रेसच्या महाअधिवेशनाला ऐतिहासिकदृष्ट्या मोठं महत्त्वं आहेच, त्याचसोबत अनेक दिग्गज अध्यक्षांनी या व्यासपीठावरुन काँग्रेसची वाटचाल मांडली आहे. अशा व्यासपीठावरुन पहिल्यांदाच राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
भाजपविरोधातील लढाई, देशातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय मुद्दे, त्याचसोबत भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न इत्यादी अनेक मुद्दे राहुल गांधी यांच्या भाषणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता राहुल गांधी नेमक्या कोणत्या मुद्द्यावर बोलतील, हे पाहावे लागणार आहे.
संबंधित बातम्या :
काँग्रेसच्या महाअधिवेशनातली 10 रंजक क्षणचित्रे
राहुल गांधींचं ट्विटर हँडल बदललं, फोटोसह स्टेटसही अपडेट
ते द्वेषाचं राजकारण करतात, आम्ही प्रेमाचं : राहुल गांधी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement