एक्स्प्लोर
एअर इंडियाच्या विमानात आणखी एका खासदाराचा गोंधळ
नवी दिल्ली : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचं एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण ताजं असतानाच विमानात खासदाराने गोंधळ घातल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. तृणमुल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांचा क्रू मेंबर्सशी वाद झाल्याची माहिती आहे.
डोला सेन यांच्यामुळे दिल्ली ते कोलकाता या एअर इंडियाच्या विमानाला अर्धा तास उशीर झाला, असा आरोप करण्यात आला आहे. डोला सेन आपल्या आईला आपत्कालीन दरवाजापासून दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी तयार नसल्याने हा वाद झाला, अशी माहिती आहे.
डोला सेन यांच्या आई व्हिलचेअरवर होत्या. मात्र विमान प्रवासाच्या नियमानुसार त्या आपत्कालीन दरवाजाजवळ बसू शकत नव्हत्या. क्रू मेंबरने त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्याची विनंती केली, तर डोला सेन यांनी कर्मचाऱ्याशी वाद घातला. त्यामुळे विमानाला अर्धा तास उशीर झाला, असं सांगण्यात येत आहे.
तिकीट बूक करताना खासदार डोला सेन यांनी व्हिलचेअरविषयी काहीही माहिती दिलेली नव्हती. मात्र प्रवासात व्हिलचेअर होती, असं स्पष्टीकरण एअर इंडियाच्या वतीने देण्यात आलं आहे.
दुसरीकडे भाजप खासदार बाबुल सुप्रीयो यांनी डोला सेन यांची पाठराखण केली आहे. खासदार नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात, असं बाबुल सुप्रीयो यांनी म्हटलं आहे.
खासदार रवींद्र गायकवाड यांचं मारहाण प्रकरण
उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला.
विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.
‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.
संबंधित बातमी : अखेर एअर इंडियाने खा. रवींद्र गायकवाडांवरील बंदी हटवली!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement