CoronaVirus | आता घरातदेखील मास्क वापरण्याची वेळ आलीय!, निती आयोगाच्या डॉ. वीके पॉल यांचा सल्ला
कोविड विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी देखील वाढली आहे. ही बाब लक्षात घेता, ऑक्सिजनचा वापर व्यवस्थित करावा. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा आकडा अगदी झपाट्यानं वाढू लागला आहे. नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. या दरम्याना निती आयोगाचे डॉ. वीके पॉल म्हणाले, "आता घरात देखील मास्क घालण्याची वेळ आहे. जेव्हा आपण घरात आपल्या कुटुंबियांसोबत असतो तेव्हा मास्क घातला पाहिजे. तसेच पाहुण्यांना घरी बोलवू नका"
कोविड विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी देखील वाढली आहे. ही बाब लक्षात घेता, ऑक्सिजनचा वापर व्यवस्थित करावा. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. घाबरल्याने परिस्थिती अजून बिघडते आणि त्यामुळे नुकसान होते. भारताकडे मेडिकल ऑक्सिजन आहे, फक्त तो रुग्णालयांपर्यंत पोहचवण्यासाठी अडचणी येत आहे.
सरकारने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन या वेळी केले. लसीकरणावरही भर देण्यास सांगितले आहे. तसेच घरात देखील नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. वीके पॉल म्हणाले, एखाद्या बाधित व्यक्तीने जर फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन नाही केले तर त्या व्यक्तीमुळे 30 दिवसात 406 व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे.
देशात कोरोना विषाणूचा आकडा अगदी झपाट्यानं वाढू लागला आहे. नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. मागील 24 तासांत भारतात एकूण 3 लाख 52 हजार 991 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा ठरत आहे. एकिकडे रुग्णसंख्या वाढ असतानाच दुसरीकडे 2 हजार 812 कोरोनाबाधितांचा मृत्यूही झाला. सध्याच्या घडीला देशातील सक्रिय रुग्णसंख्या 28 लाख 13 हजार 658वर पोहोचली आहे. रविवारी देशभरात 2 लाख 19 हजार 272 कोरोनाबाधितांनी या संसर्गावर मात केली.
सध्याच्या घडीला देशातील कोरोनास्थिती काय सांगते?
एकूण कोरोनाबाधित - 1 कोटी 73 लाख 13 हजार 163
एकूण मृत्यू- 1 लाख 95 हजार 123
एकूण कोरोनामुक्त - 1 कोटी 43 लाख 4 हजार 382
एकूण लसीकरण- 14 कोटी 19 लाख 11 हजार 223
इतर महत्त्वाच्या बातम्या :