Maharashtra Vaccination : महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण
लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 42 हजार 716 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे 1 कोटी 48 लाखांच्या आसपास ही संख्या होत आहे.
![Maharashtra Vaccination : महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण Maharashtra did vaccination over 5 lakh people today, says Chief Minister's Office Maharashtra Vaccination : महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/15/af3c9bec4e4a2106eadd5b7f9635640f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतीम आकडेवारीत वाढ होऊ शकते. 3 एप्रिलला 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आज राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे अभिनंदन केले आहे.
लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 42 हजार 716 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे 1 कोटी 48 लाखांच्या आसपास ही संख्या होत आहे. उद्याच्या लसीकरणांनंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांपेक्षा महाराष्ट्र पुढे असून आज (26 एप्रिल) राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 6155 लसीकरण केंद्र होते. त्यामध्ये 5347 शासकीय आणि 808 खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रेसर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी 3 लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.
राज्यात आज 48 हजार 700 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 71 हजार 736 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 36 लाख 01 हजार 796 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.92 टक्के झाले आहे. राज्यात एकूण 36 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज एकूण 524 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.05 टक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)