एक्स्प्लोर

Weekly Recap : पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार, राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार, 'बेस्ट'चा संप; कसा होता सरता आठवडा? वाचा सविस्तर...

Weekly Recap : या आठवड्यात 30 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान राज्यात आणि देशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तरपणे घेऊन आलोय.

India This Week : सरत्या आठवड्याभरात अनेक घडामोडी घडल्या, ज्यातील काही चांगल्या तर काही वाईट होत्या. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासोबत देशातही काही मोठ्या घडामोडी घडल्या. सरत्या आठवड्यातील घडमोडींचा सविस्तर आढावा पाहा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'लोकमान्य टिळक पुरस्कार'

पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीनं देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, उपरणं, मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना 41 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. वाचा सविस्तर...

पंतप्रधानांच्या हस्ते 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचे भूमीपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते एकाच वेळी 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांचे भूमीपूजन करणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. पुनर्विकास करण्यात येणाऱ्या देशभरातील 508 स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. वाचा सविस्तर...

पुणे मेट्रोच्या दोन मार्गिकांचं लोकार्पण

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गिकांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या दोन मार्गिका महत्वाच्या मानल्या जातात. वाचा सविस्तर...

अमित शाह यांचा पुणे दौरा

केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह 6 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत.  बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. वाचा सविस्तर...

राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) मोठा दिलासा मिळाला असून मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार आहे. वाचा सविस्तर...

चांद्रयान-3 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश

इस्रोच्या (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ने महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पोहोचताच पहिला संदेश पाठवला आहे. वाचा सविस्तर...

मुंबई पुन्हा निशाण्यावर? ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती संबंधित व्यक्तीने दिली आहे. वाचा सविस्तर...

महाराष्ट्रातून एटीएसने घातपाती कारवायांचा कट उधळला

महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) आणि एनआयने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून 15 ऑगस्टला घातपात घडवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळतेय. दहशतवादी संघटना अल सुफा आणि आयसिसशी संबंधित अनेकांना गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातून अटक करण्यात आलीय. या दहशतवाद्यांची बॉम्ब बनवणारी लॅब असल्याचंही उघड झालं आहे. वाचा सविस्तर...

कोंढव्यातील दहशतवादी मोड्युल्स एकमेकांच्या संपर्कात

एनआयए आणि एटीएस या दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी (maharashtra ATS, NIA module) उद्ध्वस्त केलेली पुण्याच्या कोंढवा भागातील दहशतवाद्यांची मोड्युल्स एकमेकांच्या संपर्कात होती आणि एकमेकांना मदतही करत होती, हे आता स्पष्ट झालं आहे. वाचा सविस्तर...

विजय वडेट्टीवार नवे विरोधी पक्ष नेते

अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील समीकरणे बदलली. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाले. त्यानंतर अखेर विरोधी पक्षनेतेपदी (Opposition Leader) विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...

राज्यात शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मिळणार मोफत उपचार मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला

बेस्ट परिवहन सेवेतील कंत्राटदारांच्या अखत्यारीत असलेल्या कंत्राटी चालकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या (BEST Strike) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संपामुळे सर्व सामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी खासगी वाहनांतून टप्पा प्रवासी वाहतूक करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. संप सुरू असेपर्यंत हे आदेश लागू असणार आहे. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. वाचा सविस्तर...

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.  वाचा सविस्तर...

ज्येष्ठ कवी ना धों महानोर यांचं निधन

प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. वाचा सविस्तर...

55 हजार कोटी खर्च करुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर 6 महिन्यातच खड्डे

समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यापासूनचा हा चर्चेचा विषय राहिला आहे. आधीच समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र थांबताना दिसत नाही. त्यातच आता हजारो कोटी खर्च करुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर अवघ्या सहा महिन्यांमध्ये खड्डे पडल्याचं दिसून येत आहे. वाचा सविस्तर...

'त्या' चार मजुरांचे मृतहेद सापडले, 70 तासांनंतर शोधकार्य संपलं

इंदापूरमध्ये विहिरीचं काम करताना माती विहीरीत पडल्यानं अपघात घडला असून ढिगाऱ्याखाली 4 कामगार अडकले होते, त्या चारही मजुरांचे मृतदेह सापडले आहेत. अखेरीस 70 तासांनंतर एनडीआरएफचं शोधकार्य थांबवण्यात आलं आहे. वाचा सविस्तर...

टेस्लाचं पहिलं ऑफिस पुण्यात

अमेरिकेतील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचं पहिले भारतातील कार्यालय पुण्याात सुरु होणार आहे. पुण्यातील विमान नगर भागात पंचशील टेक पार्कची निवड केली आहे. वाचा सविस्तर...

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
Embed widget