एक्स्प्लोर

Lokmanya Tilak Award 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला 'लोकमान्य टिळक पुरस्कार' नेमका काय आहे? सुरुवात कधीपासून, आतापर्यंतचे मानकरी कोण?

पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात आला.

Lokmanya Tilak Award 2023 :  पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीनं देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, उपरणं, मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना 41 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. 

त्यावेळी पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर मोदी आणि भाजपविरोधी आघाडीतल्या दोन नेत्यांची म्हणजे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदेंची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती. कुठलाही पुरस्कार मिळतो, तेव्हा जबाबदारी वाढते. मला मिळालेल्या पुरस्काराला लोकमान्य टिळकांचं नाव जुळलंय. त्यामुळं माझी जबाबदारी कैक पटीनं वाढलीय, असं सांगून पंतप्रधानांनी हा पुरस्कार 140 कोटी जनतेला समर्पित करत असल्याचं जाहीर केलं. या पुरस्कारातून मिळालेली एक लाखाची रक्कम आपण 'नमामि गंगे' प्रकल्पासाठी देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. छत्रपती शिवराय, फुले, टिळक, चाफेकर अशा महान नेत्यांची महाराष्ट्र ही भूमी आहे. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत, या पुण्यनगरीत येण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो, असे उद्गार त्यांनी काढले. 

1983 पासून पुरस्काराची सुरुवात...


दरवर्षी पुण्यात 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टवतीने पुरस्कार दिला जातो. टिळक महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार येतो. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला 1 ऑगस्ट 1983 पासून करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. 1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो.


लोकमान्य टिळक पुरस्कारचे आतापर्यंतचे मानकरी

गोदावरी परुळेकर
इंदिरा गांधी (मरणोत्तर)
श्रीपाद अमृत डांगे
अच्युतराव पटवर्धन
खान अब्दुल गफार खान (मरणोत्तर)
सुधाताई जोशी
मधु लिमये
बाळासाहेब देवरस
पांडुरंगशास्त्री आठवले
शंकर दयाळ शर्मा
अटलबिहारी वाजपेयी
टी. एन. शेषन
डॉ. रा. ना. दांडेकर
डॉ. मनमोहन सिंग
डॉ. आर. चिदम्बरम
डॉ. विजय भटकर
राहुल बजाज
प्रा. एम. एस. स्वामिनाथन
डॉ. वर्गीस कुरियन
रामोजी राव
एन. आर. नारायण मूर्ती
सॅम पित्रोदा
जी. माधवन नायर
डॉ. ए. सिवाथानू पिल्लई
मॉन्टेकसिंग अहलुवालिया
प्रणब मुखर्जी
शीला दीक्षित
डॉ. कोटा हरिनारायण
डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे
डॉ. ई. श्रीधरन
डॉ. अविनाश चंदेर
सुबय्या अरुणन
शरद पवार
आचार्य बाळकृष्ण
डॉ. के. सिवन
बाबा कल्याणी
सोनम वांगचूक
डॉ. सायरस पूनावाला 
डॉ. टेस्सी थॉमस

हेही वाचा-

 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raigad Marathi Family Issue : रायगडमध्ये मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूकDhananjay Deshmukh : वाल्मिक कराडला कोणता आजार झाला होता याची माहिती द्या : धनंजय देशमुखBaba Siddiqui Case Update :बाबा सिद्दिकींच्या डायरीतलं अखेरचं नाव मोहित कंबोज यांचं, झिशान सिद्दिकींचा जबाबABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines At 8AM 28 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
Maharashtra Weather: उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
Embed widget