Telangana TS SSC Result 2023 : तेलंगणा बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर; कसा आणि कुठे पहायचा? जाणून घ्या
Telangana TS SSC Result 2023 : तेलंगणा बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
Telangana Class : बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल कधी लागणार? याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये कमालीची उत्सुकता होती, मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे. तेलंगणा बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. Manabadi Telangana Board ने निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या ऑफिशिअल वेबसाईटवर bse.telangana.gov.in आणि bseresults.telangana.gov.in तसेच एबीपी देसमवर देखील पाहता येणार आहे
तेलंगणा राज्यात पाच लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. तेलंगणामध्ये 3 ते 13 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली. 4,91,862 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
ऑनलाईन निकाल कसा पाहाल?
स्टेप 1 : दहावीचे विद्यार्थी प्रथम एबीपीने दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा https://telugu.abplive.com/exam-results/telangana-ts-class-10-results-live-tsbie-62b456ac84df0.html
Step 2 दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4 : सर्व माहिती चेक करून सबमीटवर क्लिक करा
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा
गेल्या वर्षीचा निकाल
गेल्या वर्षी तेलंगणा दहावीच्या परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मोठे होते. एकूण 90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले
गेल्या वर्षीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली होती. गेल्या वर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 92.45 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 87.61 टक्के आहे.
कधी मिळणार मार्कशीट
बोर्डाच्या परीक्षेत पास होण्यासठी विद्यार्थ्यांनी कमीत कमी35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी निकाल जून महिन्यात जाहीर करण्यात आले होते. यंदा मे महिन्यातच निकाल जाहीर करण्या येणार आहे. मार्कशीट विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI